भेंडीच्या पाण्याचे ६ आश्चर्यकारक फायदे!
भेंडीची भाजी अनेकांना आवडते तर काहीजण नाकं मुरडतात.
मुंबई : भेंडीची भाजी अनेकांना आवडते तर काहीजण नाकं मुरडतात. पण तुम्ही भेंडीचे पाणी याबद्दल काही ऐकले आहे? भेंडीची भाजी आरोग्यदायी ठरते त्याचबरोबर आरोग्यासाठी भेंडीचे पाणीही खूप फायदेशीर ठरेल.
भेंडीचे पाणी कसे तयार करायचे?
यासाठी ५-६ मध्यम आकाराची भेंडी घ्या. दोन्ही बाजूने त्याची टोके कापा. त्यानंतर ती मधून कापा आणि ग्लासभर पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. सकाळी उठल्यावर पाण्यातून भेंडी बाहेर काढा. सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्या.
काय फायदे आहेत?
एक ग्लास भेंडीच्या पाण्यात ६ ग्रॅम कार्बोहाईड्रेट्स, ८० मायक्रोग्रॅम फोलेट, ३ ग्रॅम फायबर आणि २ ग्रॅम प्रोटीन असते.
अस्थमा रुग्णांसाठी हे पाणी अतिशय फायदेशीर ठरते.
यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते.
मधुमेहींसाठी तर हे पाणी वरदान ठरते. मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी महागडी औषधे घेता. पण आता घरच्या घरी हा प्रयोग करुन पहा. याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत.
कोलेस्ट्रोल कमी करण्यासाठी देखील भेंडीचे पाणी मदतगार ठरते.
वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर भेंडीचे पाण्याचे सेवन करा.
किडनीच्या समस्या दूर करण्यासही हे पाणी उपयुक्त ठरते.
टिप:
डॉक्टरांचा सल्ला घेऊन हा प्रयोग करण्यास काहीही हरकत नाही.