Benefits Of Matka Water: गरिबा घरचा फ्रीज असं मातीच्या माठाला म्हटलं जातं. पण खरं तर फ्रीजपेक्षा माठातील पाणी आरोग्यासाठी फायदेशीर आहे. भारतात पूर्वापार माठाच्या भांड्यातून पाणी प्यायले जाते. पण कालांतराने जशजशा सुविधा आल्या निर्माण झाल्याने माठाच्या ऐवजी फ्रीज आला आणि माठ हद्दपार होऊ लागला. आज अगदी गावात किंवा मोजक्याच घरात माठ पाहायला मिळतो. पण निरोगी आयुष्यासाठी माठातील पाणी पिणे उत्तम समजले जाते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयुर्वेदातही माठातून पाणी पिण्याचे अनेक फायदे सांगितले आहेत. माठातील थंडगार पाणी पिऊन तुम्ही तहान भागते शकता. आयुर्वेदात मातीच्या भांड्यात पाणी पिणे, अन्न शिजवणे चांगले मानले जाते. माठातील पाणी प्यायल्याने उच्च रक्तदाबाची समस्या नियंत्रणात येते. माती ही सर्वात शुद्ध आणि रोग दूर करणारी आहे. त्यामुळं माठातील पाणी पिणे तुम्हाला निरोगी ठेवते. 


रक्तदाब नियंत्रणात राहतो


तज्ज्ञांनुसार, माठात रात्रभर भरुन ठेवलेले पाणी सकाळी प्यायल्यास उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो. रात्री माठात पाणी भरुन ठेवा त्यानंतर सकाळी उठल्यानंतर अनोषापोटी हे पाणी प्या. माठातील पाणी जास्तीत जास्त 4 ते 5 वेळा प्या. पण एक गोष्ट लक्षात घ्या, रात्रभर पाणी माठात ठेवून द्या तरच पाण्यात विविध पोषक तत्वे मिळतील. 


गळ्याला आराम


माठातील पाणी प्यायल्याने तुम्हाला टॉन्सिल्स, सर्दी यासारख्या समस्या निर्माण होणार नाहीत. माठातील पाणी प्यायल्याने गळ्याला आराम मिळतो. 


उष्माघात


माठाच्या पाण्यामुळं खनिजे, जीवनसत्वे मिळतात. उष्माघातापासून संरक्षण मिळवण्यासाठी माठाचे पाणी पिणे फायद्याचे ठरते. माठातील पाणी प्यायल्याने तहान भागते. 


गॅससारख्या समस्यांपासून आराम 


उन्हाळ्यातून पोट खराब झाल्यास माठातल्या पाण्यामुळं आराम मिळतो. माठाचे पाणी पोटाची उष्णता नैसर्गिक पद्धतीने थंड करते. तसेच ते प्यायल्याने गॅससारख्या समस्यांपासूनही आराम मिळतो. पोटाशी संबंधित अनेक समस्या दूर होतात. 


खराब कोलेस्ट्रॉल 


माठाचे पाणी प्यायल्याने खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करून हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता माठाचे पाणी प्यायल्यामुळे कमी होते.


त्वचेचे विकार


माठात रात्रभर पाणी ठेवून सकाळी प्यायल्यामुळं त्वचेसंबंधित सर्व समस्या दूर होतात. 


वजन कमी करण्यास


माठातील पाण्यात लिंबू टाकून प्यायल्याने वजन कमी करण्यास मदत होते.