मुंबई : सकाळी उठल्यावर आपण काय करतो? खातो ? आपली लाईफस्टाईल कशी आहे यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. सकाळी रिकाम्या पोटी चहा, कॉफी प्यायल्यास आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. मात्र आयुर्वेदानुसार सकाळी उठताच नाश्तापूर्वी साजूक तूप प्यायल्यास अनेक आजारांचा धोका कमी होण्यास मदत होते. 


रिकाम्यापोटी साजूक तूप खाण्याचे आरोग्यदायी फायदे 


1. चमकदार त्वचा 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साजूक तूपामुळे त्वचेतील पेशी पुन्हा पुनरूज्जीवित होतात. यामुळे त्वचा चमकदार होते. सोबतच तूपामुळे त्वचा मुलायम होण्यास मदत होते. 


2. लठ्ठपणा


साजूक तूप शरीरातील फॅट्स कमी करण्यास मदतकरतात. नियमित सकाळी चमचाभर तूप खाल्ल्याने मेटॅबॉलिझम सुधारण्यास मदत होते. वजन आटोक्यात राहते. सकाळी उठल्यावर या '4' गोष्टी पाळा, वजन घटवा


3. मेंदूला अ‍ॅक्टिव्ह करण्यास मदत 


सकाळी रिकाम्या पोटी तूप खाल्ल्याने मेंदूच्या नसांना चालना मिळते. सोबतच यामुळे स्मरणशक्ती तल्लख राहण्यास, आकलनक्षमता सुधारण्यास मदत होते. नियमित तूप खाल्ल्याने अल्झायमरसारख्या आजाराचा धोका कमी होण्यास मदत होते. 


4. केस मजबूत होतात 


अनेकांना केसगळतीचा त्रास जाणवतो. हार्मोनल बदल, पोषक आहाराचा अभाव, प्रदूषण, धूर, धूळ यामुळे केसांचे नुकसान होते. हळूहळू केस विरळ होतात. म्हणूनच केसांना मजबूत आणि घनदाट करण्यासाठी आहारात साजूक तूपाचा समावेश करावा. 
 
अति तेथे माती हा नियम आहारालाही लागू आहे. त्यामुळे साजूक तूप आरोग्यदायी असले तरीही त्याचा आहारात समावेश करताना प्रमाणावर नियंत्रण ठेवणं गरजेचे आहे.