अळशीचे ७ आरोग्यदायी फायदे...
पूर्वीपासूनच आहारात अळशीचा समावेश करण्याची आपली परंपरा आहे.
नवी दिल्ली : पूर्वीपासूनच आहारात अळशीचा समावेश करण्याची आपली परंपरा आहे. अळशीत व्हिटॉमिन बी १, प्रोटीन, मॅग्नेशियम, ओमेगा-3 फॅटी अॅसिड ही पोषकतत्त्वे मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे आरोग्यास काय फायदा होतो जाणून घेऊया...
१. अळशीमध्ये ओमेगा फॅटी अॅसिड आणि फायबर्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे मधुमेह, कॅन्सर आणि हृद्यविकारांचा धोका कमी होतो.
२. अळशीच्या सेवनाने ब्रेस्ट कॅन्सर आणि कोलोरेक्टल कॅन्सर होण्याची संभावना कमी होते. अळशीत ओमेगा-3 फॅटी अॅसिड मुबलक प्रमाणात असल्याने ट्युमर होण्यापासून आणि वाढण्यापासून संरक्षण होते.
३. अळशीच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते. लावा स्टेट युनिवर्सिटीच्या न्युट्रीशन डिपार्टमेंट रिसर्चनुसार असे सिद्ध झाले आहे की, शरीरातील कोलेस्ट्रोलची मात्रा कमी करण्यासाठी अळशी उपयुक्त ठरते.
४. मासिक पाळीत होणाऱ्या त्रासावर अळशी फायदेशीर ठरते.
५. अळशीमुळे ब्लड शुगर नियंत्रित राहते.
६.अळशीमुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.
७. अळशीमुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.