बकरीचं दूध पिण्याचं `6` जादूई फायदे !
दूधाला पूर्ण अन्न समजले जाते.
मुंबई: दूधाला पूर्ण अन्न समजले जाते. आहारात दुधाचा समावेश केल्यास आहाराप्रमाणेच भूक शमवण्यास, स्वास्थ्य सुधारण्यास मदत होते. सामान्यपणे आपण गाय किंवा म्हशीच्या दूधाचं सेवन करतो. मात्र बकरीचं दूधही आरोग्यदायी असते हे तुम्हांला ठाऊक आहे का? बकरीच्या दूधाचा आहारात समावेश केल्याने काही आरोग्याच्या समस्या दूर होण्यास मदत होते.
बकरीच्या दूधाचे आरोग्यदायी फायदे -
बकरीचं दूध प्यायल्याने आतड्यातील सूज कमी होण्यास मदत होते असे एका संशोधनाच्या अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे. रोज ग्लासभर बकरीचं दूध पिणं आरोग्याला फायदेशीर आहे.
कॅल्शियमची शरीरात कमतरता निर्माण झाल्यानंतर हाडं कमजोर होतात. बकरीचं दूध प्यायल्याने कॅल्शियमची कमतरता भरून निघण्यास मदत होते. बकरीच्या दूधाच्या सेवनाने हाडं मजबूत होतात.
बकरीच्या दूधामध्ये सेलेनियम मिनिरल्स मुबलक प्रमाणात आढळतात. यामुळे शरीराची रोगप्रतिकारक्षमता सुधारण्यास मदत होते. शरीराचे स्वास्थ्य सुधारण्यास आणि मजबूत ठेवण्यास हे मिनरल फायदेशीर ठरते.
हृद्याचे स्वास्थ्य सुधारण्यासही बकरीचं दूध फायदेशीर आहे. यामुळे कोलेस्ट्रेरॉलचं प्रमाण नियंत्रणात राहतं. हार्ट अटॅक, स्ट्रोक्स या समस्यांचा त्रास रोखण्यासाठी बकरीचं दूध फायदेशीर ठरतं. बकरीच्या दूधात पोटॅशियम घटकही मुबलक असल्याने रक्तदाब आटोक्यात राहण्यास मदत होते.
प्रोटिनच्या सेवनामुळे शरीराचा विकास होण्यास मदत होते, बकरीच्या दूधात प्रोटीन घटक मुबलक असतात. मुलांची योग्यरित्या वाढ व्हावी असे वाटत असल्यास बकरीच्या दूधाचा आहारात समावेश करा.
5-7 खजुरांसोबत ताजं बकरीचं दूध प्यायल्यास सेक्स पॉवर वाढण्यास चालना मिळते. याकरिता रात्रभर खजूर दूधात भिजवून ठेवा. दुसर्या दिवशी हे दूधाचं मिश्रण गरम करून प्यावे.