या ८ फायद्यांसाठी अवश्य खा द्राक्ष!
सध्या द्राक्षांचा मौसम आहे.
मुंबई : सध्या द्राक्षांचा मौसम आहे. द्राक्षांची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ना सोलायचा त्रास ना बिया काढायचा. धुवून घेतले की पटापट खाऊ शकतो. द्राक्षांचा रंग कोणताही असला तरी त्यामुळे आरोग्यास खूप फायदा मिळतो. तर मग आजपासून द्राक्ष अवश्य खा...
#1. पोटांचे विकार दूर होण्यास द्राक्ष फायदेशीर ठरतात. बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो. उलटी होत असल्यास द्राक्षांमध्ये मीठ, काळीमिरी पावडर लावून खा. उलटीचा त्रास दूर होण्यास मदत होईल.
#2. मायग्रेनची समस्या असल्यास द्राक्ष आर्वजून खा. त्यामुळे डोकेदुखीवर आराम मिळतो.
#3. शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी द्राक्ष फायदेशीर ठरतात. यात भरपूर प्रमाणात आयर्न असते. शरीरात रक्ताची कमतरता असल्यास एक ग्लास द्राक्षांच्या रसात २ चमचे मध घालून प्यायल्याने रक्ताची कमतरता दूर होते.
#4. द्राक्ष खाल्याने त्वचेवर नैसर्गिक चमक येते. त्याचबरोबर डाग दूर होतात. सुरकुत्यांपासून सुटका होते.
#5. सकाळ-संध्याकाळी द्राक्ष खाल्याने आर्थराइटिस किंवा सांधेदुखीवर आराम मिळतो.
#6. भूक लागत नसल्यास आणि वजन वाढत नसल्यास द्राक्ष अवश्य खा. त्यामुळे भूक लागण्यास मदत होईल.
#7. द्राक्षामुळे रक्तातील नायट्रिक अॅसिडचे प्रमाण नियंत्रित राहते. त्यामुळे ब्लड क्लॉटिंग होत नाही आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो. त्याचबरोबर रक्तदाब नियंत्रित राहते.
#8. द्राक्षांच्या रसाने गुळण्या केल्यास माऊथ अल्सरवर आराम मिळतो.