मुंबई : दिवसातून एक दोन कप कॉफी पिणे योग्य आहे. पण त्यापेक्षा अधिक कॅफेनचे सेवन आरोग्यासाठी नुकसानकारक ठरते. अशावेळी ग्रीन कॉफी हा हेल्दी पर्याय आहे. ग्रीन कॉफीचा आरोग्यावर विपरीत परिणाम होत नाही. कारण यात कॅफेनचे प्रमाण नाहीच्या बरोबरच असते. याउलट तंदुरुस्त राहण्यासाठी ग्रीन कॉफी पिणे फायद्याचे ठरले. जाणून घेऊया ग्रीन कॉफी पिण्याचे आरोग्यदायी फायदे...


ऊर्जा मिळते 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ग्रीन कॉफी बीन्समध्ये क्रोनॉलोजीकल अॅसिड असते. ही कॉफी घेतल्याने मेटाबॉलिज्म सुधारते. मेटाबॉलिज्म सुधारल्याने सकरात्मक ऊर्जा वाढीस लागते. त्यामुळे मनही प्रसन्न राहते.


वजन नियंत्रित राहते


ग्रीन कॉफी बीन्समध्ये व्हिटॉमिन आणि खनिजं भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे शरीरातील पोषक तत्त्वांचे प्रमाण वाढण्यास मदत होते. त्यामुळे वजन नियंत्रित राहते.


मधुमेह नियंत्रित


ग्रीन कॉफी प्यायल्याने शरीरातील साखरेचे प्रमाण कमी होऊन मधुमेह नियंत्रित राहण्यास मदत होते.


रक्तदाब नियंत्रित


ग्रीन कॉफीमुळे रक्तदाब नियंत्रित राहतो. उच्च रक्तदाबामुळे हार्ट अॅटक, क्रॉनिक किडनी फेल्यूअर यांसारख्या समस्या वाढीस लागतात. ग्रीन कॉफी बीन्स प्लेटलेट्सची निर्मिती करण्यास मदत करतात. त्याचबरोबर कोलेस्ट्रोल आणि रक्तदाब नियंत्रण राहते.