या `6` फायद्यांंसाठी मध आणि दालचिनीचं मिश्रण फायदेशीर !
मध आणि दालचिनी हे दोन्ही स्वयंपाकघरातील पदार्थ जसे पदार्थांची चव वाढवतात तसेच त्याचे आरोग्यदायी फायदेदेखील असतात.
मुंबई : मध आणि दालचिनी हे दोन्ही स्वयंपाकघरातील पदार्थ जसे पदार्थांची चव वाढवतात तसेच त्याचे आरोग्यदायी फायदेदेखील असतात. म्हणूनच दालचिनी आणि मध एकत्र खाल्ल्याने कोणते फायदे होतात हे जाणून घेण्यासाठी पहा हा खास सल्ला -
दालचिनी आणि मध एकत्र खाल्ल्याचे फायदे -
दालचिनी आणि मध हे मिश्रण हृद्याचे आरोग्य जपण्यासाठी फायदेशीर आहे. हार्टअटॅकचा धोका कमी करण्यासाठीदेखील मदत होते. या मिश्रणाच्या सेवनानंतर कोलेस्ट्रेरॉलचं प्रमाण आटोक्यात ठेवण्यास मदत होते.
पचनाचे कार्यामध्ये बिघाड झाल्याने गॅस, पित्त, अपचन अशा समस्या वाढत असल्यास गरम पाण्यामध्ये मध आणि दालचिनी मिसळून प्यायल्यानंतर आराम मिळतो.
रोज सकाळी कपभर गरम पाण्यामध्ये दालचिनी आणि मध मिसळून प्यायल्याने सांध्याचे दुखणे कमी होण्यास मदत होते.
सर्दी, खोकल्याचा त्रास आटोक्यात ठेवण्यास मध आणि दालचिनीचं चाटण फायदेशीर ठरते.
तोंडातून येणार्या दुर्गंधीची समस्या आटोक्यात ठेवण्यासाठी एक दालचिनीचा तुकडा चघळत रहा.
मध आणि दालचिनीची पेस्ट चेहर्यावर लावल्याने पिंपल्सचा त्रास आटोक्यात राहतो. तसेच चेहर्यावर चमक येते.
दालचिनी आणि मधाच्या सेवनाने वजन आटोक्यात राहण्यासही मदत होते.