मुंबई : निसर्गामध्ये अनेक लहान लहान गोष्टीत संगीत दडलं आहे. त्यामुळे तुमच्या आवडीनुसार संगीत ऐकणं हे कानांना श्रवणीय आहे सोबतच तुमच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. जगभरात आजारपणात रुग्णाला अधिक सक्षम बनवण्यासाठी औषध उपचारांसोबतच डॉक्टरर्स 'म्युझिक थेरपी'चाही समावेश करतात. 


रात्री झोपण्यापूर्वी संगीत ऐकण्याचे फायदे -  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रात्री झोपण्यापूर्वी शांत संगीत ऐकणं हृद्याचे आरोग्य सुधारण्यासाठी फायदेशीर आहे. भारतीय संशोधकांनी केलेल्या एका अभ्यासानुसार, म्युझिक थेरपी परिणामकारक आहे. साधारण 26 वर्षांच्या 149 हेल्दी लोकांवर एक प्रयोग करण्यात आला. 


प्रयोगादरम्यान 3  सेशन्स झाली. पहिल्या सेशनमध्ये रात्री झोपण्यापूर्वी योग संगीत ऐकवण्यात आलं. दुसर्‍या टप्प्यात पॉप संगीत ऐकवण्यात आलं तिसर्‍या टप्प्यामध्ये लोकांना संगीत न ऐकवता झोपण्याचा सल्ला दिला. या प्रयोगानंतर सत्र सुरू होण्यापूर्वी 5 मिनिटं, संगीत ऐकताना 10 मिनिटं आणि सत्र संपल्यानंतर 5 मिनिटं हृद्याच्या कार्याची तपासणी करण्यात आली. 


प्रयोगाच्या निष्कर्षामध्ये संगीत ऐकल्यानंतर व्यक्तीवरील चिंता, ताण कमी झाला. हृद्याची धडधड ( हार्ट बीट) नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.