मुंबई : हॉवर्ड  हेल्थ पब्लिकेशनच्या रिसर्चच्या अहवालानुसार, नियमित 30 मिनिटं फुटबॉल खेळल्याने सुमारे 300 ते 500 कॅलरीज बर्न होतात. संशोधकांच्या अहवालानुसार, फुटबॉल हा असा खेळ आहे जो लिफ्टिंग, रनिंगप्रमाणेच एक्ससरसाईजचा उत्तम प्रकार आहे. फुटबॉल खेळणारी व्यक्ती फीट राहते सोबतच सकारात्मक राहते. आजकाल अनेक सेलिब्रिटी फुटबॉल खेळून स्वतःला फीट ठेवतात. 


मेंटल फीटनेस एक उत्तम वर्कआऊट 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फुटबॉल खेळताना किक, ट्विस्ट, टर्न, , स्प्रिंट असे वेगवेगळे मूव्ह्स खेळाडू खेळतात. यामुळे शरीराचा वर्कआऊट होतो. या खेळामुळे अ‍ॅरोबिक  कॅपॅसिटी वाढते. मुलांच्या मानसिक आणि शारिरीक विकासासाठी हा खेळ फायदेशीर आहे. एका रिसर्चनुसार, महिलांमध्ये फुटबॉल खेळताना महिला अधिक उत्साहीत असल्याचा अनुभव घेतात. यामुळे सकारात्मक भावना वाढते.  


प्रत्येक अवयवाचा व्यायाम  


सुट्टीच्या दिवशी उठून जीममध्ये जाणं तुम्हांला कंटाळवाणं वाटत असल्यास या दिवसात फुटबॉल खेळा. या खेळामुळे फीटनेस सुधारायला मदत होते. हा खेळ कोणत्याही वयात खेळला जाऊ शकतो. सोबतच प्रत्येक अवयवाचा वर्कआऊट झाल्याने वाढलेले वजन आटोक्यात राहण्यास मदत होते.  


फुटबॉल खेळा फीट रहा -  


आत्मविश्वास वाढतो - 


आत्मविश्वास वाढवण्यासाठी फूटबॉल फायदेशीर ठरतो. हा एक सांघिक खेळ असल्याने लहान मुलांमध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी मदत होते.  


मसल्स बळकट होतात - 


फूटबॉल खेळताना मसल्स मजबुत होण्यास मदत होते. फूटबॉल हा अतिशय वेगवान खेळ असल्याने त्यामध्ये सतत शरीराची हालचाल होत असते. परिणामी मसल्स मजबूत होण्यास मदत होते. 


कार्डियोव्हसक्युलर हेल्थ सुधारते - 


फूटबॉल खेळताना सतत होणारी धावपळ हृद्याचे कार्य सुधारण्यास मदत होते.