मुंबई : अनेक जण उपवासाला प्रामुख्याने साबुदाणा (Sago)खातात. साबुदाणा न्यूट्रिशन्सने भरपूर असलेला बॅलेन्स डाएट (Balance Diet) मानला जातो. यात व्हिटॅमिन्स (Vitamin), प्रोटीन (Protein), मिनरल्स (Minirals), कार्बोहायड्रेट्ससारख्या  (Carbohydrate)अनेक गोष्टी असतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्नायू Muscle -


साबुदाण्यामध्ये प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असल्याने, मसल्स विकसित होण्यास मदत होते. 


ब्लड प्रेशर -


साबुदाण्यामध्ये असणारं पोटेशियम रक्त प्रवाह सुरळित ठेऊन, ते नियंत्रणात ठेवतो. त्यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतं. त्याशिवाय साबुदाणा मांसपेशींसाठीही फायदेशीर आहे.


शरीरात हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आहारात 'या' गोष्टींचा समावेश करा


पोटाच्या समस्या -


पोटाच्या कोणत्याही प्रकारच्या समस्येवर साबुदाणा खाणं, फायदेशीर असल्याचं मानलं जातं. साबुदाणा पचनक्रिया ठिक करुन, गॅस, अपचन आणि इतर समस्यांमध्ये लाभदायक ठरु शकतो.


एनर्जी -


साबुदाणा कार्बोहायड्रेट्सचा चांगला स्त्रोत आहे. जो शरीरात त्वरित आणि आवश्यक उर्जा देण्यासाठी मदतशीर आहे.


शरीरातील हाडांसाठी -


साबुदाण्यामध्ये कॅल्शियम, लोह, व्हिटॅमिन-के भरपूर प्रमाणात असतं. जे शरीरातील हाडं मजबूत ठेवण्यासाठी आणि आवश्यक लवचिकतेसाठी फायदेशीर ठरु शकतं.


'ही' असू शकतात Immunity System कमजोर असण्याची लक्षणं


हाय ब्लड प्रेशर - 


साबुदाणा हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात राखण्यासही फायदेशीर ठरतो.