मुंबई :  हळदीचे दूध अत्यंत आरोग्यदायी आहे. हळदीचे दूध पिण्याचे अनेक फायदे आहेत. रोगप्रतिकारकशक्ती सुधारते, पचनक्रिया सुरळीत होते, असे इतर अनेक फायदे होतात. तर आज वर्ल्ड मिल्क डे निमित्त जाणून घेऊया का प्यावे हळदीचे दूध...


रोगप्रतिकारकशक्ती सुधारते


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हळदीच्या दुधामुळे रोगप्रतिकारकशक्ती सुधारते. त्याचबरोबर सर्दी-खोकल्याचा त्रास होत असल्यास हळदीचे दूध पिणे फायदेशीर ठरते. त्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी किंवा रात्री झोपण्यापूर्वी ग्लासभर हळदीचे दूध अवश्य प्या. शारीरिक व्यायाम करणाऱ्यांसाठी हळदीचे दूध फायदेशीर ठरते.


पचनविकार दूर होण्यास मदत


हळदीच्या दूधामुळे पचनक्रिया सुधारते. छातीतील जळजळ, ब्लोटिंग, गॅसेस या समस्या दूर होण्यास मदत होते. तसंच भूक न लागणे, अपचन या समस्या दूर होतात.


आरोग्याच्या इतर समस्यांवर


रोगप्रतिकारकशक्ती कमकूवत असल्याने होणारे आजार दूर करण्यास हळदीचे दूध उपयुक्त ठरते. सांधेदुखी, पचनासंबंधित समस्या, त्वचेच्या समस्या दूर करण्यास हळदीचे दूध फायदेशीर आहे. 


शांत झोप येण्यासाठी


निद्रानाशाची समस्या दूर करण्यासाठी हळद घातलेले कोमट दूध झोपण्यापूर्वी प्या. साध्या दूधापेक्षा हळदीचे दूध पिणे अधिक फायदेशीर ठरते. कारण त्यामुळे शरीरातील अमिनो अॅसिडची निर्मिती वाढते. हळदीमुळे रक्तातील इन्सुलिनचे प्रमाण वाढते. त्यामुळे शरीरात अमिनो अॅसिड घेण्याचे प्रमाण वाढते. परिणामी शरीर रिलॉक्स होते, मूड शांत होतो आणि शांत झोप लागते. 


रक्त शुद्ध होते


हळद डिटॉक्सिफिकेशनचे काम अत्यंत उत्तमरित्या करते. त्यामुळे शरीरातील विषद्रव्ये दूर होतात. कारण ही विषद्रव्ये रक्तवाहिन्यात जमा होऊन इतर आजारांना आमंत्रण देतात. हळदीमुळे रक्तातील लिव्हरचे कार्य सुरळीत होऊन रक्तातील टॉक्सिन्स दूर होतात.