can Diabetes patients eat sweet potato? काही कंदमुळं आरोग्यासाठी अत्यंत फायद्याची असतात. त्यातही ती खाण्याच्या पद्धतीसुद्धा आरोग्यास पूरक असल्यामुळं आहारतज्ज्ञसुद्धा त्यांच्या सेवनाचा सल्ला देतात. थंडीच्या दिवसांमध्ये सर्वाधित खाल्लं जाणारं कंदमूळ म्हणजे रताळं. इंग्रजीत स्वीट पोटॅटो म्हणून संबोधलं जाणारं हे कंदमूळ खाताना मधुमेह असणाऱ्यांना मात्र वेगळाच संभ्रम असतो. Diabetes असणाऱ्यांनी रताळं खावं का हा, त्यांना पडलेला प्रश्न. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नावामध्येच 'स्वीट'चा उल्लेख असल्यामुळं हा एक गोडाचाच पदार्थ असा अनेकांचा समज. आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार या प्रश्नाचं नेमकं उत्तर काय? ते पाहून घ्या. 


Diabetes असणाऱ्यांनी रताळं खावं का? 


जाणकार आणि आहारतज्ज्ञांच्या मते रताळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट असतात. शिवाय मॅग्नेशियम आणि फायबर अर्थात तंतूमय घटकांचा भरणाही असतो. जे शरीरात इन्सुलिन रेजिस्टेंसचं काम करता आणि यामुळं रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहतं. यामध्ये असणारं बीटा केरोटीन आणि इतर मिनरल्स टाईप 2 डायबिटीस रुग्णांसाठी फायद्याचे असतात. 


हेसुद्धा वाचा : अंबानींच्या आणखी एका कंपनीची विक्री; यावेळी सरकारनंच केली खरेदी 


मधुमेहाच्या रुग्णांना रताळ्याचं सेवन वर्ज्य नाही. पण, त्यांनी ते योग्य पद्धतीनं खावं असा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. रताळं भादून किंवा ते सॅलड म्हणून कच्चं खाण्याचा सल्ला दिला जातो. तुम्ही स्मूदीमध्येही ते वापरू शकता. 


रताळ्याचे फायदे 


दृष्टीदोष दूर करणं- रताळ्यामध्ये असणारा बीटा कॅरोटीन हा घटक आणि काही अँटीऑक्सिडेंट त्याच्या गुणवत्तेला आणखी वाढवतात. ज्यामुळं डोळ्यांच्या समस्या दूर होतात. दृष्टीदोष नाहीसे होतात. 


हृदयाचं आरोग्य - रताळ्यामध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडेंट तत्त्वं असल्यामुळं हृदयाचं आरोग्य उत्तम राहून तत्सम आजारपणं येत नाहीत. 


पचनक्रियेत सुधारणा - रताळ तंतूमय घटकांचा एक उत्तम स्त्रोत आहे. ज्यामुळं पोटाचं आरोग्य सुधारून पचनक्रिया सुरळीत राहते. रताळ्याच्या सेवनामुळं बद्धकोष्टता उदभवत नाही. 


त्वचेचं सौंदर्य - रताळ्यामध्ये विटामिन ए, सी, ई आणि इतर अँटीऑक्सिडेंट असतात. ज्यामुळं केस आणि त्वचेला या पोषक तत्त्वांचा थेट फायदा होतो. रताळ्याच्या सेवनामुळं त्वचेचा पोत कायम राहण्यास मदत होते. 


(वरील माहिती तज्ज्ञांची वैयक्तिक मतं असून, झी 24 तास त्याची खातरजमा करत नाही.)