मुंबई : शरीराला तंदुरुस्त आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी तसेच विविध आजारांपासून संरक्षण करण्यासाठी दररोज व्यायाम करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही सर्व आरोग्य तज्ज्ञांना हाच सल्ला देताना पाहिले असाल की, आपण दररोज चालायला हवे, कारण असे केल्याने व्यक्तीचा लठ्ठपणा, मधुमेह, पोट आणि हृदयरोगाचा धोका कमी करू शकतो. पण या आजारांपासून संरक्षण मिळवण्यासाठी आणि शरीर सुदृढ करण्यासाठी केवळ चालणेच नव्हे, तर योग्य मार्गाने चालणे आवश्यक आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण तुम्हाला कदाचित माहित नसेल की, चालण्याची ही एक पद्धत असते, परंतु बहुतेक लोक माहिती अभावी चुकीच्या मार्गाने चालतात, ज्यामुळे त्यांना चालण्याचे पूर्ण फायदे मिळत नाहीत.


त्यामुळे आम्ही आज तुम्हाला चालण्याचा योग्य मार्ग कोणता आहे हे तुम्हाला सांगणार आहोत, त्यामुळे जर तुम्ही अजूनही चुकीच्या मार्गाने चालत असाल तर ही बातमी वाचा आणि योग्य मार्गने चालून शरीराला याचा फायदा होऊ द्या.


एक इंग्लिश वेबसाईट ब्रीदिंग, मॉबिलिटी आणि माइंड-बॉडी कोच Dana Santas यांनी सांगितले की, लोक चालताना शरीराचे संतुलन सांभाळत नाहीत. ज्यामुळे त्यांच्या शरीराची स्थिती बिघडते आणि गुडघे, कंबर, पाय इत्यादींमध्ये वेदना होत असल्याच्या तक्रारी ते करतात.


बहुतेक लोक शरीराच्या एका बाजूला झुकून चालतात किंवा नेहमी बॅग हँग करण्यासाठी, मोबाईल धरण्यासाठी किंवा वस्तू उचलण्यासाठी हाताचा वापर करता, ज्यामुळे तुम्ही मोकळ्या हाताने किंवा मोकळ्या पणाने चालत नाही.


निरोगी शरीरासाठी चालण्याचा योग्य मार्ग 


फिटनेस कोचच्या मते, चालताना आणि दोन्ही हात स्विंग करताना तुम्ही नेहमी शरीर सरळ ठेवावे. हात फिरवणे म्हणजे चालताना दोन्ही हात पुढे मागे सरकलेच पाहिजेत. पण लक्षात ठेवा की जेव्हा तुमचा एक हात समोर असेल तेव्हा दुसरा हात मागे असावा. म्हणजे दोन्ही हात एकमेकांच्या विरुद्ध दिशेने फिरले पाहिजेत. तसेच चालण्याच्या या मार्गाबरोबरच चालण्याच्या काही आणखी महत्त्वाच्या टिप्सचीही काळजी घेतली पाहिजे.


जसे की,
1. चालताना, दोन्ही हात किंवा खांद्यांचा वापर प्रत्येक वेळी बॅग उचलण्यासाठी आणि मोबाईल किंवा इतर काही वस्तू उचलण्यासाठी केला पाहिजे.


2. काही महिन्यांनंतर, आपल्या शूजचे तळवे तपासा. कारण, एका बाजूला झुकून चालल्याने तुमचा एक शूज अधिक झिजतो. ज्यामुळे शरीराच्या एका बाजूला जास्त तणाव असतो. जर तुमच्या पायाचे कोणतेही शूज खूप घातलेले असतील तर शूज बदला.


3. शरीराचे संतुलन सुधारण्यासाठी, तज्ज्ञ  सिंगल लिंब यूनीलेटरल एक्सरसाइज (Single limb Unilateral Exercise) करण्याची शिफारस करतात. ज्यामुळे शरीराचे संतुलन सुधारते तसेच पाय मजबूत होतात.