Rare Bolood Group : महाराष्ट्रातील  (Maharashtra) एका व्यक्तीने आपल्या हृदय शस्त्रक्रियेसाठी स्वत:चं रक्च दान केलं. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार यवतमाळ जिल्ह्यातील 50 वर्षीय राजेश अग्रवाल छातीत दुखत असल्याच्या कारणावरुन रुग्णालयात दाखल झाले. तपासात राजेश अग्रवाल यांच्या छातीत ट्यूमर (माइक्सोमा) असल्याचं निदान झालं. त्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी रक्ताची आवश्यकता असल्याने त्यांचा रक्तगट कोणता आहे याची टेस्ट करण्यात आली. टेस्टमध्ये त्यांचा रक्तगट खूपच रेअर असल्याचं निष्पन्न झालं. भारतात या रक्त गटाचे केवळ 0.01 टक्के लोकं आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेअर ब्लड ग्रुप
राजेश अग्रवाल यांच्या शरीरात आढळलेल्या रक्तगटाचं नाव गेर्बिच फेनोटाइप (Gerbich Phenotype) असं आहे. राजे अग्रवाल यांच्यावर मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात ओपन हार्ट सर्जरी (Open Heart Surgery) करण्यात आली. या शस्त्रक्रियेसाठी राजेश यांना स्वत:च रक्त द्यावं लागलं.  गेर्बिच फेनोटाइप हा रक्तगट अत्यंत दुर्मिळ असून यात अतिरिक्त अँटीबॉडी असतात. 


कार्डियोथोरेसिक सर्जन डॉ. पवन कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार गेर्बिच फेनोटाइप या रक्तगटाचे राजेश अग्रवाल हे बहुदा भारतातले एकमेव व्यक्ती आहेत. मायक्सोमा हा ट्यूमरचा अत्यंत दुर्मिळ आजार आहे. हा ट्यूमर हृदयात विकसित होतो आणि कालांतराने ह्दयाचं काम बंद पाडतो. त्यामुळे राजेश अग्रवाल यांच्यावर शस्त्रक्रियेचं मोठं आव्हान डॉक्टरांसमोर होतं. पण त्याहीपेक्षा मोठं आव्हान होत ते त्यांना लागणार रक्तगट शोधण्याचं. 


दोन महिने आधी राजे अग्रवाल यांना ह्रदयात ट्यूमर झाल्याचं निदान झालं होतं. ट्यूरच्या शस्त्रक्रियेसाठी ते मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल झाले. पण तपासणीत त्यांच्या ह्रदयात अनेक ब्लॉकेजेस असल्याचं डॉक्टरांना कळलं. त्यामुळे ट्यूमर आणि ब्लॉकेजेस असं दुहेरी आव्हान निर्माण झालं. 


त्यामुळे शस्त्रक्रियेसाठी अतिरिक्त रक्तगटाची आवश्यकता भासणार होती. राजेश अग्रवाल यांच्या आई, तीन भाऊ-बहिण यांच्या रक्ताची चाचणी करण्यात आली. पण त्यांचा रक्तगट जुळून येत नव्हता. त्यानंतर डॉक्टरांनी अनेक ठिकाणी गेर्बिच फेनोटाइप रक्तगट उपलब्ध होऊ शकतो का याची चाचपणी केली. पण त्यांच्या हाती निराशा लागली. शेवटी राजेश अग्रवाल यांनी स्वत:च रक्त दान करण्याची विनंती डॉक्टरांकडे केली. ब्लड ट्रांफ्यूजन हेड रुची मेहरा यांनी दिलेल्या माहितीनुसार ही प्रक्रिया सोपी नव्हती. त्यांच्या शरीरातून रक्त काढल्याने त्यांच्या जीवाला धोका उद्भवू शकत होता. 


यासाठी डॉक्टरांनी आधी त्यांचं हिमोग्लोबिन वााढवण्यावर भर दिला. त्यानंतर तीन आठवड्यांच्य कालावधीत तीन वेळा त्यांचं रक्त काढण्यात आलं. राजेश अग्रवाल यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला आहे