Signs of Heart Attack a Month Before : सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात पुरेशी झोप, अवेळी जेवण, कामाचा ताण, आर्थिक परिस्थिती याचं गणितच बिघडलंय. याचा परिणाम शरीरावर होऊ लागलाय. मानसिक स्वास्थ बिघडणं, पोटाचे आजार हदयाशी संबंधीत आजार वाढले आहेत. पण यातही लोकांमध्ये हार्टअटॅकच्या (Heart Attack) प्रमाणात प्रचंड वाढ आहे. हार्ट अटॅकमुळे मृत्यूच्या संख्येतही वाढ झालीय. पण एका अभ्यासानुसार हार्ट अटॅक येण्यापूर्वी एक महिना आधीच संकेत मिळतात. (Signs of Heart Attack)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यातही सायलेंट हृदयविकाराचा झटका खूप धोकादायक असू शकतो. ते ओळखणे फार कठीण होऊन बसते. बऱ्याच वेळा लोक सायलेंट हृदयविकाराच्या झटक्याच्या हल्ल्याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. छातीत हलके दुखणे किंवा अचानक श्वास लागणे ही एक सामान्य गोष्ट मानली जाते आणि दुर्लक्ष केलं जातं. तुम्हाला माहित आहे का हार्ट अटॅकचे संकेत एक महिना आधीच शरीरात दिसून येतात. ही लक्षणे कोणती आहेत? हार्ट अटॅक आल्यावर कोणतीा काळजी घेतली पाहिजे? जाणून घ्या...


जर्नल सर्कुलेशनमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, हार्ट अटॅकचे संकेत एक महिना आधीच दिसू लागतात. या तपासणी प्रक्रियेत 500 हून अधिक महिलांनी सहभाग घेतला होता.यापैकी 95 टक्के महिलांना हार्ट अटॅक येण्याच्या महिन्याभरापूर्वी शरीरात काही बदल जाणवू लागले होते. हे बदल हार्ट अटॅकची लक्षणे होती. 71 टक्के महिलांना जास्त थकवा येत होता. तर 48 टक्के महिलांना झोपेशी निगडीत समस्या जाणवत होती. तर अन्य स्त्रियांना छाती दुखणं, छातीवर दाब येणे, वेदना ही लक्षणे जाणवत होती.


एक महिना आधीच दिसतात हार्ट अटॅकचे संकेत


हार्ट अटॅक येण्याच्या एक महिना आधी थकवा येणे, झोप कमी लागणे, थकवा जाणवणे, सतत चिंता सतावणे, हृदयाचे ठोके वाढणे, अशक्तपणा किंवा हात सुन्न होणे, विसरभोळेपणा सुरु होणे, दिसायला कमी लागणे, भूक न लागणे, हात पायांना मुंग्या येणे, श्वास घेण्यास त्रास होणे या सर्वगोष्टी म्हणजे हार्ट अटॅकची लक्षणे असू शकतात. ही लक्षणे दिसताच ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.


अशी घ्या काळजी


हार्ट अटॅकमध्ये स्वतःचे संरक्षण कसे करावे? असा प्रश्न आपल्याला पडतो. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचं हृदय सुरक्षित ठेवण्यासाठी निरोगी आहाराचे लक्ष्य ठेवणे. सध्याच्या धकाधकीच्या काळात निरोगी आहाराकडे लक्ष राहत नाही. आणि हेच हार्ट अटॅकचे कारण ठरू शकते. याशिवाय धुम्रपान आणि मद्यपानाची सवय असेल तर वेळीच ही सवय सोडून द्या. वेळेवर जेवण आणि पुरेशी झोप हे देखील तुमच्या आरोग्यासाठी महत्त्वाचं आहे.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)