health Tips: च्यवनप्राशचं सेवन करणं `या` लोकांना पडू शकतं महागात; कारण...
Chyawanprash News: आपल्या सगळ्यांनाच आपल्या आरोग्याची (Health news) काळजी असते त्यातून हिवाळा आला की आपल्याला आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. अशा काळात आपण उष्ण पदार्थांचे सेवन करतो जेणेकरून आपल्या शरीराला आराम मिळेल. त्यातील एक पदार्थ म्हणजे च्यवनप्राश.
Chyawanprash News: आपल्या सगळ्यांनाच आपल्या आरोग्याची (Health news) काळजी असते त्यातून हिवाळा आला की आपल्याला आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. अशा काळात आपण उष्ण पदार्थांचे सेवन करतो जेणेकरून आपल्या शरीराला आराम मिळेल. त्यातील एक पदार्थ म्हणजे च्यवनप्राश. च्यवनप्राशचे अनेक फायदे (Chyawanprash Benefits) आपल्या शरीरासाठी आहेत. पण तुम्हाला माहितीये का की काही लोकांना च्यवनप्राश खाणं आरोग्यासाठी (Chyawanprash health tips) हानिकारक ठरू शकतं. च्यवनप्राश हे औषध आहे खरं परंतु च्यवनप्राश खाणं 'या' लोकांनी वेळीच टाळावे. च्वयनप्राश खाल्यानं रोगप्रतिकारशक्ती वाढते. च्यवनप्राशमध्ये मध, साप केशर, पांढरी मुसळी आणि तमालपत्र यांसारखे गुणधर्म असतात. यांचे मिश्रण त्यात असते. त्यामुळे हे आरोग्यासाठी पोषक असते. परंतु काही लोकांनी च्यवनप्राश सेवन करणं टाळावे. कोणत्या लोकांनी च्यवनप्राशचे सेवन करू नये? चला जाणून घेऊया.
कोणी चवनप्राशचं सेवन करू नये?
1. मधुमेह पेशंट (Diabetes Patient)
मधूमेह रूग्णांनी चुकूनही च्यवनप्राशचे खाऊ नये. अनेकदा लोकं च्यवनप्राशला आरोग्यदायी म्हणून खातात तर काही च्यवनप्राशची चव संतुलित ठेवण्यासाठी त्यात थोडंस गोडही गोष्टी टाकतात. परंतु हे चुकीचे असून यावेळी मात्र तुम्ही च्यवनप्राश खाणं टाळावे. च्यवनप्राश खाल्ल्यानं शरीरातील साखरेचे प्रमाण वाढू शकते आणि जर तुम्हाला मधूमेह असेल तर वेळीच च्यवनप्राश खाणं टाळा कारण त्यानं तुमची शारिरीक समस्या आणखीनं वाढू शकते.
2. किडनी पेशंट -
वर म्हटल्याप्रमाणे, हिवाळ्यात आपण उष्ण पदार्थ खाण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून आपल्या शरीराला त्याचा फायदा होईल. त्यात आपण च्यवनप्राश खातो. परंतु च्यवनप्राशचा प्रभाव हा उष्ण असल्यानं ते पचायला अत्यंच जड जाते. जर तुम्हाला किडनी संंबंधित कुठलेही आजार असतील अथवा तुम्हाला कुठला त्यासंबंधी रोग असेल तर तुम्ही च्यवनप्राश खाणं टाळलं पाहिजे.
3. पोटाचे विकार -
ज्यांना पोटाच्या समस्या आहेत त्यांनी च्यवनप्राशचे सेवन करू नये. वर म्हटल्याप्रमाणे च्यवनप्राश हे पचायला जड असते त्यामुळे शक्यतो पोटाच्या समस्यांनी जर तुम्ही आजारी असाल तर तुम्ही च्यवनप्राशचे खाऊ नका. काहींना भरपेट जेवल्यानंतरही च्यवनप्राश खायची सवय असते. त्यामुळे त्यांना नंतर अपचन किंवा पोटाच्या समस्या वाढू लागतात तेव्हा अशांनी च्यवनप्राश खाऊ नये.
4. ब्लड प्रेशर (BP Patient) रूग्ण -
जर तुम्ही उच्च रक्तदाब असेल तर तुम्ही च्यवनप्राशचे सेवन टाळावे कारण च्यवनप्राशची उष्णता तुम्हाला त्रासदायक ठरू शकते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)