Cancer Vaccine in India : महिलांसाठी जीवघेणा ठरणाऱ्या गर्भाशयाच्या कॅन्सरवर (Uterine Cancer) लस (Vaccine) तयार करण्यात आलीय. 100 दिवसात ही लस भारतात दाखल होणार आहे. या लसीमुळे गर्भाशयाचा कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकतो असा दावा करण्यात आला आहे. तर गर्भाशयाच्या कॅन्सरमुळे होणाऱ्या 44 टक्के मृत्यूंमध्ये या लसीमुळे घट होणार असल्याचं संशोधनातून समोर आलंय. सर्व्हावॅक ह्यूमन पॅपिलोम व्हायरस अर्थात HPV लस गर्भाशयाच्या कॅन्सरवर रामबाण उपाय ठरलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गर्भाशयाच्या कॅन्सवर लस 
मॉडर्ना (Modern) आणि फायजर (Pfizer) लस बनवताना जी पद्धत वापरली त्याच धर्तीवर HPV लस तयार करण्यात आलीय. कीट्रूडा औषधासोबत या लसीचं एकत्रीकरण करण्यात आलंय. कीट्रूडा एक अँटीबॉडी (Antibody) मिश्रण आहे ज्याचा वापर रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी होतो. भारतात ही लस येताच 9 ते 14 वयोगटातील मुलींसाठी HPV लसीकरण मोहिमेचा कार्यक्रम हाती घेण्यात येईल.


9 ते 14 वयोगटातील मुलींचं लसीकरण
पुढील चार पाच महिन्यात HPV लस निर्माण करून भारत या रोगावरची लस उत्पादित करणाऱ्या देशांच्या यादीत असेल. केंद्र सरकार लवकरच राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमातंर्गत 9 ते 14 वयोगटातील मुलींसाठी HPV लसीकरण मोहिमेचा कार्यक्रम हाती घेईल. या लसीची किंमत लोकांच्या खिशाला परवडेल अशी म्हणजे 200 ते 400 रुपयांच्या दरम्यान असणार आहे.


गर्भाशयाचा कॅन्सर हा भारतातील महिलांना होणारा सर्वात दुसरा मोठा आजार आहे आणि या रोगामुळे भारतात दरवर्षी 67 हजार महिलांचा बळी जातो. पण आता या कॅन्सरवर लस शोधण्यात आलीय, त्यामुळे ही लस भारतासाठी किती महत्त्वाची आहे याचा अंदाज तुम्हाला येऊ शकतो. त्यामुळे महिलांसाठी ही लस रामबाण उपया ठरणार आहे.