मोबाईल सिमसारखी Health Policy करू शकता पोर्ट, जाणून घ्या प्रोसेस
Health Policy Portability: प्रत्येक कुटुंबासाठी आरोग्य हे महत्त्वाचं असतं. कारण घरातील एखाद्या व्यक्तीला आजारपण आलं तर बचत खर्ची होऊन जाते. कधी कधी अशी स्थिती येते की, कर्ज घ्यावं लागतं. त्यामुळे आपल्या कुटुंबाचं आरोग्य विषयक भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी हेल्थ इंश्युरन्स घेणं आवश्यक आहे. कोविड काळात तर हेल्थ इंश्युरन्सचं (Health Insurance) महत्त्व अधिक अधोरेखित झालं आहे.
Health Policy Portability: प्रत्येक कुटुंबासाठी आरोग्य हे महत्त्वाचं असतं. कारण घरातील एखाद्या व्यक्तीला आजारपण आलं तर बचत खर्ची होऊन जाते. कधी कधी अशी स्थिती येते की, कर्ज घ्यावं लागतं. त्यामुळे आपल्या कुटुंबाचं आरोग्य विषयक भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी हेल्थ इंश्युरन्स घेणं आवश्यक आहे. कोविड काळात तर हेल्थ इंश्युरन्सचं (Health Insurance) महत्त्व अधिक अधोरेखित झालं आहे. पण तुमच्या एखाद्या कंपनीची पॉलिसी असेल आणि त्यांच्या सेवेबद्दल तुम्ही समाधानी नसाल तर काळजी करू नका. मोबाईल सिमप्रमाणे तुम्ही हेल्थ पॉलिसी (Health Policy) सहजपणे पोर्ट करू शकता. हेल्थ पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया काय आहे? जाणून घेऊयात.
पॉलिसी पोर्ट करताना ही काळजी घ्या
तुम्ही एखादी नवी हेल्थ इंशुरन्स कंपनी निवडली असेल तर त्याबाबत आधी नीट माहिती काढा. त्यानंतरच निवड करा. कारण वारंवार बदलण्याची गरज पडू नये. या व्यतिरिक्त पॉलिसी संपण्यापूर्वी 45 ते 60 दिवसांपूर्वी पॉलिसी पोर्ट करण्यासाठी अप्लाय करा. हे तुम्ही स्वत:ही करू शकता किंवा फायनान्सियल प्लानरकडून करू शकता. नियमीत असलेली पॉलिसी तुम्ही पोर्ट करू शकता. पण काही कारणास्तव तुम्ही पॉलिसी थांबवली असेल तर इतर कोणत्याही कंपनीकडे पोर्ट करू शकत नाही.
अशी पूर्ण कराल प्रक्रिया
नवीन कंपनी निवडल्यानंतर अर्ज भरा. यानंतर, नवीन कंपनी तुम्हाला पोर्टेबिलिटी आणि प्रपोजल फॉर्म पाठवेल, त्यानंतर तुम्ही हे दोन्ही फॉर्म भरा. या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती आणि आधीच्या विमा कंपनीची माहिती द्यावी लागेल. पॉलिसी खरेदी केल्यानंतर, 30 दिवसांचा प्रतीक्षा कालावधी, आधीपासून अस्तित्वात असलेल्या रोगांसाठी प्रतीक्षा कालावधी, विशिष्ट रोगांसाठी प्रतीक्षा कालावधी आणि जुन्या पॉलिसीचा नो क्लेम बोनस देखील नवीन पॉलिसीमध्ये हस्तांतरित केला जाऊ शकतो.
बातमी वाचा- पॅकेजिंगसाठी 1 जानेवारी 2023 पासून नवे नियम लागू, काय बदल होणार जाणून घ्या
या कागदपत्रांची आवश्यकता असेल
पॉलिसी पोर्ट करताना तुम्हाला काही कागदपत्रांची आवश्यकता असते. यामध्ये आरोग्य विम्याच्या नूतनीकरणाशी संबंधित नोटीस किंवा मागील वर्षाच्या पॉलिसी शेड्यूल, नो क्लेम बोनसचा दावा करण्याची घोषणा, दावा केल्यास डिस्चार्ज समरी, तपास आणि फॉलो-अप रिपोर्ट, मेडिकल हिस्ट्री, रिपोर्ट आणि कॉपी इत्यादींचा समावेश आहे.