रात्री मोजे घालून झोपण्याची सवय ठरु शकते घातक; `या` गंभीर आजाराचा धोका
Health Tips: अनेक जणांना रात्री झोपताना मोजे घालून झोपण्याची सवय असते. पण हीच सवय तुम्हाला देखील असेल तर आत्ताच सावध व्हा. कारम यामुळं अनेक आजार जडू शकतात.
Health Tips In Marathi: निरोगी आयुष्यासाठी पुरेसी झोप घेणे ही तितकेच गरजेचे असते. अनेकदा कामाचे वेळापत्रक व वेळी-अवेळी जेवणे याचा परिणाम झोपेवर येतो. झोप न येणे, झोप आली तरी सतत जाग येणे, अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. काही जण शांत झोप लागावी यासाठी मंद प्रकाश, स्लो म्युझिक लावतात. तर काही जण पायात मोजे घालूनदेखील झोपतात. मात्र, पायात मोजे खालून झोपणे आरोग्यासाठी नुकसानदायक ठरु शकते. Express.co.uk ने अलीकडेच जारी केलेल्या एका रिसर्चनुसार, थंड वातावरणात मोजे घालून झोपल्याने झोपेवर सकारात्मक प्रभाव पडत असला तरी आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, झोपताना मोजे घातल्याने झोप चांगली लागती तसंच वारंवार झोपमोडदेखील होत नाही. रात्रभर मोजे घातल्याने शरीराचे तापमान कमी होण्यास मदत मिळते. मात्र, जर गरजेपेक्षा जास्त टाइट फिटिंगचे मोजे घातल्यास काही शारिरीक समस्याही उद्भवू शकतात.
जोपर्यंत डॉक्टर तुम्हाला मोजे घालण्याची परवानगी देत नाही तोपर्यंत मोजे खालून झोपू नका. कारण अतिशय घट्ट मोजे घातल्यास पायातील रक्तप्रवाह कमी होतो. तुम्ही जेव्हा मोजे घालून झोपता तेव्हा रक्तप्रवाह खंडित होऊ शकतो. तसंच, जे लोक रोज मोजे घालून झोपतात त्यांच्या शरिराचे तापमान तुलनेने अधिक वाढूदेखील शकते. अशावेळी पायांना हवा लागत नाही त्यामुळं घाम येऊन नखांमध्ये फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे.
नखांमधील फंगल इन्फेक्शन हे साधारणतः नखांच्या वरील भागांपासून होण्यास सुरुवात होते त्यानंतप संपूर्ण नखांमध्ये पसरते. फंगल इन्फेक्शनमुळं नखे पिवळी पडणे, सतत तुटणे तसंच, नखाच्या आजबाजूच्या भागात सूज येणे आणि वेदना होणे, अशा समस्या निर्माण होऊ शकतात. यावर उपचार घेण्यासाठी तुम्ही लगेचच डॉक्टरांशी संपर्क करु शकता.
स्त्रियांपेक्षा पुरुषांना नखांचे फंगल इन्फेक्शन अधिक होण्याची शक्यता आहे आणि हा संसर्ग मुलांपेक्षा प्रौढांमध्ये अधिक होतो. जर तुमच्या कुटुंबातील सदस्यांना अशा प्रकारचे संसर्ग वारंवार होत असतील तर तुम्हालाही ते होण्याची शक्यता जास्त असते. वृद्ध प्रौढांना नखांना फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता असते कारण त्यांच्यात रक्ताभिसरण कमी असते. वाढत्या वयानुसार नखेही हळूहळू वाढतात आणि घट्ट होतात.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)