vitamin deficiency tips: सध्या धावपळीच्या जगात सगळी पोषक तत्व आपल्या आहारातून आपल्या  शरीराला मिळतात असं नाही , आणि मग शरीराला योग्य प्रमाणात पोषक तत्व मिळत नाहीत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आणि परिणामी आपण थकलेलो दिसतो   केलेल्या अभ्यासानुसार  वारवरून निरोगी दिसणाऱ्या 50टक्के भारतीयांच्या शरीरात vitamin Bची कमतरता दिसून आली आहे , आहारातून काही पोषक तत्व शरीराला मिळू शकत नाहीत.


अशा वेळी VITAMIN B च्या सप्लिमेंट्स डॉक्टर आपल्याला देतात ज्याचा फायदा होतो. 


वाढत्या वयानुसार अनेक शारीरिक बदल होत असतात आणि त्यांना समोर जाण्यासाठी व्हिटॅमिनची कमतरता भरून काढन खूप गरजेचं असत. 


 व्हिटॅमिनच्या कमतरतेचे तोटे


व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हाडे आकुंचित होऊ लागतात, स्नायू कमकुवत होऊ लागतात, त्वचा कोरडी आणि सैल होते आणि आपले केस पातळ होऊ लागतात.


व्हिटॅमिन्सची  गरज कोणाला जास्त भासते 


व्हिटॅमिन्सच्या कमतरतेचा धोका वृद्ध , गरोदर स्त्रिया आणि कुपोशषणाने ग्रस्त असणाऱ्यांना जास्त असतो. 


 मल्टीविटामिन ठरतात प्रभावी 


मल्टीविटामिन सप्लिमेंट्स(MULTIVITAMIN SUPPLIMENTS ) घेतल्याने  आहारातील पौष्टिकतेची कमतरता भरून निघते . व्हिटॅमिन  A  ,C,  D  ,E आणि K  सारखी पोषक तत्त्वे आणि कॅल्शियम, मॅग्नेशियम, क्रोमियम, जस्त, सेलेनियम, लोह आणि पोटॅशियमचे पोषण मिळते