Sprouted Wheat: वाढते वजन, अपचनाची समस्या? मोड आलेले गहू खाऊन दिसेल फायदा
Sprouted Wheat: गव्हात अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. हे घटक आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. पण तुम्ही कधी अंकुर आलेले गहू खाल्ले आहे का? आपल्यापैकी बहुतेकांचे उत्तर `नाही` असेच असेल. म्हणूनच एकदा मोड आलेले गहू खाणे आवश्यक आहे.
Sprouted Wheat: गहू हे असे धान्य आहे ज्याचा वापर जगभरात मोठ्या प्रमाणात केला जातो. त्याच्या पिठापासून अनेक स्वादिष्ट पदार्थ तयार केले जातात. आपल्यापैकी बहुतेकांना या गव्हापासून तयार झालेली चपाती आवडते. गव्हात अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. हे घटक आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. पण तुम्ही कधी अंकुर आलेले गहू खाल्ले आहे का? आपल्यापैकी बहुतेकांचे उत्तर 'नाही' असेच असेल. म्हणूनच एकदा मोड आलेले गहू खाणे आवश्यक आहे.
अंकुरलेल्या गहू खाण्याचे फायदे
१) वजन नियंत्रणात येते
वजन वाढणे ही काही नवीन समस्या नाही. शतकानुशतके लोक याला बळी पडत आहेत. परंतु कोरोना विषाणूच्या महामारीनंतर लॉकडाऊन लागला आणि 'वर्क फ्रॉम होम' कल्चर सुरु झाले. यामुळे लोकांच्या शारीरिक हालचाली बर्याच प्रमाणात कमी झाल्या. ज्यामुळे लोकांचे वजन झपाट्याने वाढले असून आता कमी होण्याचे नाव घेत नाही. अशा परिस्थितीत तुम्ही मोड आलेले गहू खाऊ शकता. हे गहू नाश्त्यात खाणे नेहमी फायदेशीर ठरते. त्यामुळे दिवसभर ऊर्जा टिकून राहते आणि तुम्हाला जास्त वेळ भूक लागत नाही. यामुळे जास्त खाण्याकडे तुमचे दुर्लक्ष होते. नंतर हळूहळू वजन कमी होऊ लागते.
२) पचन चांगले होण्यास मदत
ज्या लोकांना नेहमी पोटदुखीची तक्रार असते त्यांनी रोजच्या आहारात अंकुरलेल्या गव्हाचा समावेश करावा. अंकूर आलेल्या गव्हामध्ये भरपूर फायबर असते. ज्यामुळे बद्धकोष्ठता, ऍसिडिटी, गॅस आणि पचनाशी संबंधित अनेक समस्या दूर होतात.
३) हाडे मजबूत होतील
वाढत्या वयाबरोबर हाडे पूर्वीसारखी मजबूत राहत नाहीत आणि नंतर हळूहळू शरीरात अशक्तपणा येऊ लागतो. यापासून बचाव करण्यासाठी सकाळी उठून अंकुरलेले गहू खावेत. कारण असे केल्याने हाडांना जबरदस्त ताकद मिळते. कारण त्यात कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते.हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेले प्रमाण आढळते.