Diet According Blood Group: जागतिक आरोग्य संस्था म्हणजेच डब्ल्यूएचओकडून दरवर्षी १४ जून हा दिवस जागतिक रक्तदाता दिवस म्हणून साजरा केला जातो. आपल्या शरिरात रक्ताचे फार महत्व आहे. जाती, धर्मात विभागलेल्या माणसांसाठी अपघातासारख्या प्रसंगात रक्तदान जिवनदान देणारे ठरते. आपल्याला आपला रक्तगट माहिती असणे आवश्यक आहे. तुमच्या रक्तगटानुसार तुमचा आहार कसा असायला हवा याची आरोग्यतज्ञांनी दिलेली माहिती जाणून घेऊया.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रत्येक रक्तगटाचा स्वतःचा स्वभाव वेगळा असतो. म्हणूनच अन्न रक्तगटाशी संबंधित आहे. रक्तगटाचे ए, बी, एबी आणि ओ असे चार प्रकार आहेत. डॉक्टरांना भेटून तुम्ही तुमचा रक्तगट जाणून घेऊ शकता. मनुष्याचा आहार जितका अधिक पौष्टिक असेल तितके शरीर निरोगी राहते. तुमचा आहार रक्तगटानुसार असावा हे आपल्यापैकी फार कमी जणांना माहिती असेल. त्यामुळे याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 
 


ए रक्तगट 


ए रक्तगट असलेल्यांची रोगप्रतिकारक शक्ती अत्यंत संवेदनशील असते. त्यामुळे त्यांनी जेवणाची विशेष काळजी घेतली पाहिजे. या लोकांनी मांसाचे सेवन शक्यतो टाळावे किंवा कमी करावे. मांस हे पचायला वेळ लागतो. या रक्तगटाच्या लोकांनी चिकन आणि मटणापासून अंतर ठेवावे. ए रक्तगटाच्या व्यक्तींना हिरव्या पालेभाज्या, गाजर, नाशपाती, लसूण, तृणधान्ये, बीन्स आणि फळे असा आहार ठेवणे फायदेशीर ठरते. दूध आणि त्यापासून बनवलेले पदार्थ, तांदूळ आणि अंडी यांचेही सेवन काळजीपूर्वक करावे. दही किंवा सोया दूध खाणे त्यांच्यासाठी केव्हावी चांगल
 


बी रक्त गट आहार


बी रक्त गट असणाऱ्या व्यक्ती खाण्याच्या बाबतीत खूप भाग्यवान समजल्या जातात. या रक्तगटाचे लोक काहीही खाऊ शकतात. हिरव्या पालेभाज्या, फळे किंवा चिकन-मटण देखील यांच्यासाठी फायदेशीर ठरते. बी रक्तगट असलेल्या व्यक्तींची  पचनसंस्था खूप मजबूत असते, त्यामुळे शरीरात चरबी जमा होत नाही. दूध आणि त्यापासून बनवलेल्या वस्तू, अंडी खाणे बी रक्तगट असलेल्या व्यक्तींना फायदेशीर ठरते. 
 


एबी रक्त गट आहार


 


आपल्या ग्रुपमध्ये एबी रक्तगट असलेल्या व्यक्ती हमखास सापडतील. ए आणि बी यांनी खाण्याच्या आणि टाळण्याचे पदार्थ एबी रक्तगट असलेल्या व्यक्तींना लागू होतात. दुधापासून बनवलेल्या गोष्टी तुम्ही खाऊ शकता.
जास्त फळे आणि भाज्या खाणे यांच्यासाठी फायदेशीर ठरते. त्यांच्यासाठी अंडी फायदेशीर असतात. असे असले तरीही मांसाहारापासून बनलेले पदार्थ त्यांनी टाळणे गरजेचे आहे. 


ओ रक्तगट आहार


ओ रक्तगटाच्या लोकांनी प्रोटीन खाणे फायदेशीर ठरते. कडधान्य, मांस, मासे, फळे यांसारखे उच्च प्रथिनयुक्त पदार्थ त्यांच्या आहारात असणे उपयुक्त ठरते. धान्य आणि बीन्स याचे आहारात संतुलन राखणे आवश्यक आहे.