हिवाळा (winter) सुरु झाला असून शरीरात उर्जा (energy) तयार होण्यासाठी खाण्यापिण्याची विशेष काळजी घेतली जाते. थंडीच्या मोसमात शरीराला उष्णता देणाऱ्या पदार्थांची विक्री वाढते. उर्जा वाढवणाऱ्या या खाद्यपदार्थांमध्ये अंड्यांना (Egg) लोकांची पसंती मिळते. या ऋतूमध्ये लोक अंडी खाणे पसंद करतात. उकडलेल्या अंड्यांमध्ये हेल्दी फॅट (Fat) असते, जे वजन वाढणे थांबवते. मात्र कोणत्याही गोष्टींचे अतिसेवन हे हाणीकारक ठरु शकते. तसेच थंडीमध्ये जास्त प्रमाणात अंडी खाणं धोकादायक ठरू शकते.


कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंड्यांमध्ये भरपूर प्रथिने असतात. म्हणूनच त्याचे मर्यादित प्रमाणात सेवन केले पाहिजे. अंड्याचे प्रमाणाबाहेर सेवन केल्यास त्याचा तुमच्या किडनीवर परिणाम होऊ शकतो. तुम्ही दिवसातून एक ते दोन अंडी खाऊ शकता, पण यापेक्षा जास्त खाऊ नका. अंड्याच्या पिवळ्या भागात फॅट सोबतच व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के असते. ज्यांना वजन वाढवायचे आहे त्यांच्यासाठी हे चांगले आहे. पण लठ्ठ व्यक्ती, उच्च रक्तदाब आणि हृदयाच्या संबधित ज्यांना समस्या आहेत त्यांनी अंड्यातील पिवळा भाग खाऊ नये. भरपूर फॅट असल्याने कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका असतो, ज्यामुळे अशा लोकांना त्रास होऊ शकतो.


उलट्या आणि अतिसार सारख्या समस्या


अंडी योग्य प्रकारे न उकडून खाल्ल्यास उलट्या आणि जुलाब यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. अंडे खाण्याआधी ते योग्यप्रकारे उकडले आहे ना लक्षात घ्यायला हवं. अर्धे कच्चे अंडे तुमच्यासाठी आरोग्याच्या समस्या निर्माण करू शकतात.


मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका


ज्यांना मधुमेह आणि हृदयविकाराची समस्या आहे, त्यांनी अंड्याचे अतिसेवन टाळावे. जास्त प्रमाणात अंडी खाल्ल्याने अशा रुग्णांची स्थिती बिघडू शकतो.


अंडी खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याल?


योग्य अंडी निवडल्यावरच ते खाण्याचे फायदे होतील. 


अंडी विकत घेताना लक्षात ठेवा की अंड्याला तडे गेले नाहीत ना हे तपासून पाहा


सामान्य आकाराची अंडी निवडा.


जर अंडी दुकानामध्ये बराच वेळापासून ठेवली असतील तर अशी अंडी खरेदी करू नका. कधीकधी अशी अंडी खराब होतात.