High Blood Pressure मध्ये वरदान ठरतो कच्चा लसूण, जाणून घ्या याचे फायदे
Blood Pressure : तुमचा रक्तदाब पुन्हा रुळावर आणण्यासाठी, रक्तदाब नियंत्रित करण्याचा प्रभावी मार्ग म्हणून तुम्ही काही पदार्थांचे सेवन केले पाहिजे.
High Blood Pressure : उच्च रक्तदाब हा 'सायलेंट किलर' म्हणून ओळखला जातो. अनियंत्रित रक्तदाब धोकादायक असू शकतो कारण त्यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा पक्षाघात होऊ शकतो. बैठी स्वरुपाची कामे आणि रक्तदाब वाढवणाऱ्या पदार्थांचे सेवन हे दोन घटक आपली जीवनशैली रक्तदाब (Blood Pressure) वाढण्याची मुख्य कारणे ठरू शकतात. यावर उपाय म्हणून लसाणाचा वापर केला जातो. लसणामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल (bad cholesterol) कमी करण्यास मदत मिळते.
बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना उच्च रक्तदाबाचा (High Blood Pressure) त्रास होत असल्याचे तुम्ही ऐकले असेल. उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींना आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. सामान्य रक्तदाब 120/80 mmHg इतका असतो. यापेक्षा जास्त झाल्यास उच्च रक्तदाबाचा त्रास सुरू होतो. तसेच एलिसिन (organic compounds) नावाच्या सेंद्रिय संयुगामुळे अनेक वैद्यकीय परिस्थितींवर उपचार करण्यासाठी लसणाचा वापर केला जातो. लसूण (Garlic) तुमच्या तोंडात तिखट चव सोडण्याशिवाय तुमचा रक्तदाब प्रभावीपणे कमी करू शकतो.
खाद्यपदार्थांची (food) चव वाढवण्यासाठी त्यात लसणाचा वापर हमखास केला जातो. प्रत्येक स्वयंपाक घरात दररोज वापरला जाणारा लसूण आरोग्यासाठीही गुणकारी आहे हे अनेकांना माहित नसते. लसणामध्ये अनेक पोषकतत्त्व आढळतात, ज्यामुळे अनेक आजारांवर हे औषध मानले जाते. लसणामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत मिळते. तसेच हे उच्च रक्तदाबावर नियंत्रण मिळवण्यासाठी फायदेशीर मानले जाते.