Harmful Foods for health News In Marathi : आपण जो आहार घेत असतो त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. म्हणूनच डॉक्टरांसह अनेक तज्ञ आपल्याला सकस आहार घेण्याचा सल्ला देतात. अलिकडे आपली जीवनशैली बदलत चालली आहे. परिणाम आपल्या आहाराचा परिणाम आपल्या आरोग्यावर दिसून येतो. अनेकजण फास्ट फूड खाण्याला प्राधान्य देतात. या खाद्यपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात ट्रान्स फॅट आणि कृत्रिम साखर असल्यामुळे ते शरीरासाठी धोकादायक असतात. हे अन्न खाल्ल्याने यकृतामध्ये चरबी जमा होते. त्यामुळे फॅटी लिव्हरची समस्या उद्भवते. धावत्या युगात तुमच्या शरीराला तंदुरुस्त राहण्यासाठी कोणते पदार्थ आवश्यक आहेत? कोणते पदार्थ हानिकारक आहेत? हे पाहणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे काही खाद्यपदार्थ टाळावेत. या पदार्थांचा तुमच्या आहारात समावेश केल्यास अल्कोहोलपेक्षा जास्त नुकसान होऊ शकते. हा पदार्थ कोणत्या प्रकारचा आहे? ते जाणून घेऊया..


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यकृत अन्न पचवण्यापासून ते रक्त शुद्ध करण्यापर्यंतचे काम करतात. शरीरातील या सर्वात महत्त्वाच्या अवयवाचे वजन सुमारे 1500 ग्रॅम असते. त्यातही तुम्ही धोकादायक पदार्थ खाल्लात तर यकृतासाठी हानिकारक ठरु शकतं. अल्कोहोल व्यतिरिक्त, इतर पदार्थ देखील यकृताला हानी पोहोचवू शकतात.  


प्रोसेस्ड कार्ब्स


जर तुम्हाला तुमचे यकृत निरोगी ठेवायचे असेल. तर आहारातून प्रक्रिया केलेले प्रोसेस्ड कार्ब्स पदार्थातून काढून टाका. हे पदार्थ तुमच्या यकृतासाठी खूप हानिकारक आहेत. यात सोडियमचे प्रमाण जास्त असते. आणि सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाणही जास्त असते.


मिठाचे प्रमाण जास्त


मीठ शरीरासाठी घातक असते. जेवढे तुम्ही मीठ कमी कराल तेवढे तुमचे आयुष्य वाढेल. जागतिक आरोग्य संघटनेनेही याबाबत सावधगिरी बाळगली आहे. मीठाचे पदार्थ तुमच्या यकृताच्या आरोग्यासाठी खूप वाईट असतात. जास्त सोडियममुळे उच्च रक्तदाब होतो. हृदयविकाराचा पुरावा वाढतो आणि स्ट्रोक होऊ शकतो. तसेच, सोडियम यकृतासाठी हानिकारक आहे. त्यामुळे मीठ खाणे ताबडतोब बंद करा. वेफर्स, चिवडा यामध्ये मीठ भरपूर प्रमाणात असते. पॅकबंद खाद्यपदार्थांमध्येही मीठाचे प्रमाण जास्त असते.


सॉफ्ट ड्रिंक्स


 सॉफ्ट ड्रिंक्स हे अगदी सर्वांना आवडते. जर तुम्हाला सॉफ्ट ड्रिंक्स पिण्याची सवय लागली असेल तर ते लगेच बंद करा. जे लोक जास्त सॉफ्ट ड्रिंक्स पितात त्यांना नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (NAFLD) होण्याचा धोका जास्त असतो.


शुगर ड्रिंक्स


शर्करायुक्त ड्रिंक्समध्ये साखरेचे प्रमाण जास्त असल्याने त्यांचे आरोग्यासाठी खूप फायदे आहेत. या साखरयुक्त पेय प्यायल्याने शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. ज्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स होऊ शकतो.


एसिटामिनोफेन


एसिटामिनोफेन हे सुरक्षित मानले जाते. पण जेव्हा त्याचा गैरवापर किंवा त्याचा अतिरेक होतो. तेव्हा त्याचे टॉक्सिसिटीचे कारण बनू शकते. यामुळे तुमच्या यकृताचेही नुकसान होऊ शकते. Acetaminophen Acetaminophen म्हणजे पॅरासिटामोल. हे पेन किलर म्हणून त्याचा वापर केला जातो.