Summer Tips to Beat the Heat in Marathi: गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या तापमानात कमालीची वाढ झाली आहे. जागतिक वातावरणातील हवामान बदलामुळे यंदाचा उन्हाळा दरवर्षीपेक्षा वेगळा असल्याचे जाणवत आहे. परिणामी मुंबईकरांना उन्हाचे चटके सोसावे लागत आहे. उन्हाचा तडाखा इतका जबरदस्त आहे की, त्यामुळे नागरिकांना विविध आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावं लागत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कडक उन्हापासून शरीराचा बचाव करण्यासाठी शहाळ्याचं पाणी, फळांच रस, दुधात मिसळलेली तांदळाची खीर, गुलकंद, कैरीच पन्हे, लिंबू सरबत, जिऱ्याचं सरबत इत्यादींचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे. शक्य असल्यास बाहेर जाणे टाळा. पण तरीही जात असाल तर, पाणी प्या आणि घराबाहेर पडा. उन्हापासून तुमचे डोळे आणि चेहरा सुरक्षित ठेवण्यासाठी टोपी आणि गॉगल घाला. सुती कपडे वापरा आणि स्वच्छता राखा. प्लास्टिक चप्पल वापरणे टाळा.


अतिउष्णतेमुळे फ्रीज किंवा कुलरमधील पाणी पिण्यासारखे वाटते. पण थंड पाणी पिणे टाळा. यामुळे घसा, दात आणि आतडे यावर दुष्परिणाम होऊ शकतात. म्हणून, साधं अथवा माठातील पाणी पिणे चांगले आहे. गडद, जाड आणि घट्ट कपडे घालणे टाळा. विशेषत: दुपारी 12 ते 3:30 या वेळेत घराबाहेर पडणे टाळा. बाहेर जाण्यापूर्वी गॉगल, छत्री, टोपी आणि बूट घाला. तसेच डिहायड्रेशनमुळे चक्कर येणे, अशक्तपणा आणि डोकेदुखीची नोंद डॉक्टरांनी निरीक्षणासाठी केली आहे. अशा वेळी सतत पाणी, लिंबाचा रस, कोकम किंवा फळांचा रस प्या, पाणी प्या, ओआरएस प्या, दुपारच्या वेळी भूक लागल्याने अनेक मसालेदार पदार्थ खाण्याची इच्छा होते; मात्र दुपारी तेथे आल्यानंतर मसालेदार पदार्थ आणि पोटाशे खाल्ल्याने हा विकार बळावण्याची शक्यता असते. त्यामुळे मसालेदार पदार्थ खाणे टाळावे.


काय सांगतात डॉक्टर ?


सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत घराबाहेर पडणे टाळा. खूप पाणी प्या. टोपी आणि स्कार्फ घाला. थकल्यासारखे किंवा अस्वस्थ वाटत असल्यास, त्वरित उपचार घ्या, असे आवाहन नायर रुग्णालयातील कान, नाक आणि घसा शस्त्रक्रिया विभागाचे प्राध्यापक आणि प्रमुख डॉ. बच्ची हाथीराम यांनी केले. तसेच प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवा. अशक्तपणा, लठ्ठपणा, डोकेदुखी, सतत उष्णता ही या आजाराची लक्षणे आहेत. जर त्याला गंभीर त्रास होत असेल तर त्याने ताबडतोब डॉक्टरांकडून उपचार घ्यावेत.