Benefits Of Fermented Food: फर्मेंटेड फुड म्हणजेच आंबवलेले पदार्थ. इडली, डोसा हे पदार्थ तयार करताना सर्वात आधी त्याचे पीठ आंबवले जाते. आंबवलेले पदार्थ आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. आंबवण्याच्या प्रक्रियेत बॅक्टेरिया आणि यीस्टसारखे सूक्ष्मजीव स्टार्च आणि साखर सारख्या कर्बोदकांमधे अल्कोहोल किंवा ऍसिडमध्ये रूपांतरित करतात. त्यामुळं जास्त प्रमाणात आंबवलेल्या पदार्थांची चवदेखील थोडी आंबट होते. आंबवण्याच्या प्रक्रियेत चांगले जीवाणू वाढतात. या जीवाणूंना प्रोबायोटिक असं म्हणतात. आंबवलेल्या पदार्थांचे सात फायदे जाणून घ्या. 


आंबवलेले पदार्थ कसे बनवले जातात? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंबवलेले पदार्थ बनवण्यासाठी काही पदार्थांना काही तासांसाठी रुम टेम्परेचरवर ठेवून दिले जाते. म्हणजेच जर तुम्हाला इडली किंवा डोसा बनवायचा असेल तर डाळ-तांदुळ मिक्सरमध्ये वाटून त्याचे पीठ तयार करुन ते आंबवण्यासाठी ठेवावे. अशाच प्रकारे तुम्ही ढोकण्याचे पीठदेखील तयार करु शकता. काही तास हे पीठ रुम टेम्परेचरवर ठेवल्याने त्याची आंबण्याची प्रक्रिया सुरू व्हायला लागते. पीठ आंबल्याने त्याची चवदेखील बदलते. तर, पीठ आंबत असताना ते हळूहळू फुलायला लागते. पीठ लवकर आंबवायचे असल्यास बेकिंग सोडा, यीस्ट किंवा फ्रूट सॉल्ट टाकू शकतात. 


आंबवलेल्या पदार्थांचे आरोग्यासाठी फायदे (Fermented Food Benefits) 


1. प्रोबायोटिक


बहुतेक आंबवलेल्या पदार्थांमध्ये चांगले जीवाणून असतात. जे प्रोबायोटिक असतात. हे जीवाणू तुमच्या आतड्यातील बॅक्टेरियाचे संतुलन पुनर्संचयित करण्यास मदत करतात आणि पचनासंबंधीत सर्व समस्या दूर करतात. 


2. पचनास मदत करतात


नैसर्गिक साखर आणि स्टार्चचे विघटन झाल्यामुळं आंबवलेले पदार्थ पचायला सोपे असतात. 


3. जेव्हा आपण काही पदार्थ आंबवतो तेव्हा आपण त्यांची आरोग्य क्षमता वाढवण्यास मदत करत असतो. तुमच्या आतड्यातील बॅक्टिरीया वाढवून शरीराला बी जीवनसत्व आणि व्हिटॅमिन के तयार करण्यची क्षमता निर्माण करते. 


4. मूड सुधारतो


आंबवलेल्या पदार्थांमध्ये  Lactobacillis helveticus and Bifidobacteria longum हे दोन गुणधर्म आढळतात. या मुळं मानसिक ताण-तणाव आणि डिप्रेशनसारख्या समस्येंवर मात करण्यास मदत करतात. 


5. हृदयाचे आरोग्य सुधारते


आंबवलेले पदार्थ हे पौष्टिक आणि संतुलित आहार आहे. या आहारामुळं हृदयविकाराच्या झटका येण्याची शक्यता कमी होते. तसंच, कोलेस्ट्रॉल बॅलेन्स आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो. 


6. रोगप्रतिकार शक्ती वाढवते


आंबवलेल्या पदार्थांमुळं रोगप्रतिकार शक्ती वाढते. त्यामुळं सर्दी, खोकला यासारखे आजार कमी होतात. व्हिटॅमिन सी, आयर्न, झिंक इत्यादी गुणधर्म आढळतात. 


7. वजन कमी करते


अनेक संधोशनानुसार, आंबवलेल्या पदार्थामुळं वजन व पोटाचा घेर कमी होण्यास मदत होते. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)