Health Tips: मायक्रोवेव्हमध्ये डब्बा गरम कराल तर तुम्हाला येईल नपुंसकता...जाणून घ्या सर्वकाही
Microwave Food Disadvantages : माइक्रोवेव मधून निघणारे वेव्ह्स जेवणात अशा घटकांना निर्माण करतात जे रक्तातील कॅन्सर होण्यासाठी कारणीभूत ठरतात.. (it cause blood cancer)
Microwave Food Disadvantages : तुम्ही ऑफिसमध्ये आहेत लंच ब्रेक झाला कि काय करता? सर्वात आधी कॅन्टीन मध्ये जाऊन डब्बा मायक्रोवेव्ह मध्ये गरम करता आणि गरमगरम जेवणावर ताव मारता .. स्वाभाविक आहे कि ऑफिसमध्ये ताज आणि गरमागरम जेवण मिळणार तरी कसं ? भल्या सकाळी आपण जेवणाचा डब्बा घेऊन ऑफिसला निघतो दुपारी जेवणाच्या वेळेपर्यंत डब्यातलं जेवण थंड होऊन जात.. अशा वेळी मायक्रोवेव्हमध्ये (microwave) गरम करून ते खाल्लं जात... पण तुम्हाला हे माहित आहे का ज्या मायक्रोवेव्हमध्ये तुम्ही जेवण गरम करता आणि खाता ते तुमच्या आरोग्यासाठी किती घातक आहे?
हो हे तितकंच खरं आहे, विज्ञान (science and technology) आणि तंत्रज्ञानाने खूप प्रगती केलीये पण त्याचे जसे फायदे आहेत तसेच त्याचे तोटे सुद्धा आहेत. चला तर जाणून घेऊया मायक्रोवेव्हमध्ये जेवण बनवताना आणि गरम करताना काय काळजी घ्यायला हवी .. (precaution while heating food in microwave )
गर्भवतीला पोहचू शकते सर्वात जास्त हानी
मायक्रोवेव्हमधून निघणारे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन (electromagnetic rediation) गर्भवती महिलांना (preganant woman) हानी पोहोचवू शकतात , असे एका संशोधनात (research) सांगण्यात आले आहे.
रेग्युलर मायक्रोवेव्हमध्ये शिजवलेले अन्न खाल्ल्याने न जन्मलेल्या बाळाला म्हणजेच पोटात असणाऱ्या बाळाला हानी पोहोचते तसेच गर्भपात होण्याची शक्यता असते. अमेरिकन सोसायटी ऑफ रिप्रॉडक्टिव्ह हेल्थमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, प्लास्टिकमध्ये आढळणारे काही पदार्थ अन्नाद्वारे शरीरात जाऊन नुकसान करतात.
असं म्हणतात कि वारंवार मायक्रोवेव्ह मध्ये जेवण गरम केल्यामुळे जेवणाची पौष्टिकता नष्ट होते जवळ जवळ 60 ते 90 टक्क्यांनी जेवणाचं नुकसान होत. जे खाल्ल्याने शरीराचं नुकसान होणार हे नक्की...
खूप वेळ मायक्रोवेव्हमध्ये जेवण गरम केलं आणि ते जेवण तुम्ही जेवला तर तुमची इम्युनिटी म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती हळू हळू बंद होऊन जाते.. पाहा हे किती भयानक आहे. (imunity)
माइक्रोवेव मधून निघणारे वेव्ह्स जेवणात अशा घटकांना निर्माण करतात जे रक्तातील कॅन्सर होण्यासाठी कारणीभूत ठरतात.. (it cause blood cancer)
माइक्रोवेवमध्येएक मिनिटात जेवण गरम तर होत पण जेवणात असे काही बदल होतात ज्याने ते पचण्यास जड होऊन जात... आणि पचनसंस्थेशी निगडित आजार आपल्या मागे लागतात ..
चुकूनही प्लॅस्टिकच्या भांड्यात जेवण गरम करू नका
- प्लास्टिक आपल्या शरीरासाठी आणि एकूणच पृथ्वीवर सर्व जीवांसाठी खूप हानिकारक आहे हे आपण सारेच जाणतो..प्लॅस्टिकच्या भांड्यात अन्न गरम केल्यामुळे आपल्याला खूप नुकसान होऊ शकत.
- प्लास्टिकच्या भांड्यात जेवण गरम केल्याने त्याचे पार्टिकल्स जेवणात मिसळले जातात आणि त्यामुळे स्त्री पुरुष दोघांमध्येही प्रजनन क्षमतेसंबंधी अनेक आजार उध्दभवू शकतात. (infertality in womens and men both )
- प्लास्टिकमध्ये Phthalates आणि Bisphenol A नावाची दोन रसायने असतात. काही अहवालानुसार ही दोन्ही रसायने अंतःस्रावी ग्रंथींवर परिणाम करतात.
- काही संशोधनात असेही आढळून आले आहे की ही रसायने इस्ट्रोजेन आणि टेस्टोस्टेरॉन सारख्या हार्मोन्सच्या क्रियांवर देखील परिणाम करतात.
- WHO डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार, मायक्रोवेव्हिंग दरम्यान, प्लास्टिकच्या भांड्यांमधून ही रसायने काही प्रमाणात अन्नामध्ये प्रवेश करू शकतात.
माइक्रोवेवमध्ये जेवन गरम केल्यानंतरही काळजी
- जेवण गरम करताना काचेच्या भांड्यांचाच उपयोग करा,
- प्लॅस्टिकच्या भांड्याला अजिबात मायक्रोवेव्हमध्ये ठेऊ नका मग ते BPA फ्री असलं तरीही वापरू नका.
- माइक्रोवेवमधुन गरम करून काढलेले अन्न लगेच प्लॅस्टिकच्या भांड्यात काढू नका.
- एखादा पदार्थ प्लॅस्टिकच्या भांड्यात घेऊन फ्रिजमध्ये ठेवला असेल तर मायक्रोवेव्हमध्ये गरम करण्याआधी ते सिरॅमिक किंवा काचेच्या भांड्यात काढूनघ्या ..
(टीप : वरील माहिती सामान्य माहितीच्या आधारे आहे झी २४ तास याची खातरजमा करत नाही)