Health News : चहाला वेळ नसते पण वेळेवर चहा पाहिजे, असे बोर्ड अनेकदा तुम्ही जाता येताना वाचत असाल. चहा हा सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात एक महत्त्वाचा भाग झालाय. अनेकांना ऑफिसमध्ये काम करताना चहा प्यायची सवय असते. तर कित्येकांना सकाळी सकाळी उठल्यावर चहा लागतोच. मात्र, रिकाम्या पोटी चहा पित असाल तर त्याचे तोटे देखील आहेत. हे तोटे जाणून घेऊया...


रिकाम्या पोटी चहा पिल्याचे परिणाम- 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिकाम्या पोटी (Drinking tea on an empty stomach) चहा पिण्याच सर्वात मोठे नुकसान म्हणजे तुम्हाला अॅसिडिटीचा त्रास जाणवू लागतो. रिकाम्या पोटी गरम चहा पाचक रसांवर प्रभावी असल्याने अनेकदा पित्ताचा त्रास जाणवतो. पचन तंत्र कमजोर होण्यामागील सर्वात मोठे कारण देखील चहाच आहे.


चहा अती उकळलेला असल्यास आरोग्यासाठी आणखी नुकसानदायक ठरतं,  कॅफीन अधिक मात्रेत असल्याने पोटाच्या समस्या उद्भवतात. रिकाम्या पोटी चहा पिण्यानं त्याचा परिणाम भूकेवर देखील होतो किंवा अनेकदा भूक लागणे बंद होते.


आणखी वाचा - केस गळण्याची समस्या आहे? असा करा बीटरूटचा वापर


दरम्यान, सकाळी चहा पिऊन व्यायाम करणाऱ्यांचा याचा फरक लगेच जाणवतो. सकाळी सकाळी चहा पिण्याऐवजी एखाद्या फळाचा ज्यूस पिणं फायद्याचं ठरतं. त्यामुळे  त्याचा आरोग्याला फायदा देखील होतो. त्याचबरोबर मानसिकदृष्ट्या चांगला परिणाम दिसतो.