Benefits of Lemon Peel: आपल्या सर्वांना लिंबूचं सरबत फार आवडतं. उन्हाळ्यात तर लिंबाच्या सरबताचा आस्वाद आपण घेत असतो, आता तर फ्रेश लाईम सोडा म्हणून लिंबाचा उपयोग आपण करतोच. पण आपल्याला सवय आहे ती म्हणजे लिंबाचे सरबत तयार केल्यानंतर आपण मात्र लिंबांची सालं फेकून देतो. (health tips these are the useful benefits of lemon peels dont waste it see what are the healthy benefits)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण थांबा तुम्हाला माहितीये का की लिंबाचेही अनेक फायदे आहेत. तेव्हा जाणून घ्या लिंबाच्या सालीचा तुम्हाला नक्की कसा फायदा होईल, हे वाचून तुम्ही नक्कीच लिंबाची सालं फेकून देण्याची सवय सोडाल. 


 


लिंबाच्या सालीत असतात 'हे' गुणधर्म - (These are the properties in Lemon)
लिंबाच्या सालीत व्हिटॉमिन ए (Vitamin A,C), सी, पोटॅशियम (Potassium), कॅल्शियम (Calcium), फायबर (Fiber) यांसारखे अनेक पोषकघटक असतात. तसेच या सालीत कॅल्शियम आणि व्हिटॉमिन सी भरपूर असल्याने हाडे आणि दात मजबूत होतात. व्हिटॉमिन सीची आपल्या त्वचेसाठी अत्यंत गरजेचे आहे. याच्या वापरामुळे त्वचेचा कॅन्सर, हृदयाचे आजार दूर होण्यास मदत होते. त्यात असलेल्या अॅँटी ऑक्सीडेंटमुळे (Anti - Oxident) स्किन कॅन्सरला प्रतिबंध होण्यास मदत होते.


लिंबाच्या साली कशाकशावर गुणकारी? (What are the healthy Benefits)
लिंबाच्या सालीच्या वापरामुळे आपली रोगप्रतिकारकशक्ती वाढते. लिंबाच्या सालीत असलेल्या मिनरल्समुळे पचनक्रिया सुधारते. त्यामुळे अनेक आजारांपासून सुटका मिळते.  तोंडाला येणाऱ्या दुर्गंधीवर लिंबाची साल फायदेशीर ठरते. लिंबाच्या सालीमुळे रक्तदाब नियंत्रित राहतो. मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी लिंबाची साल उपयुक्त ठरते. ताण दूर करण्यास लिंबाच्या सालीची मदत होते.  लिंबाच्या सेवनाने लिव्हर साफ होण्यास मदत होते. रक्ताभिसण चांगले होते.


भांडी चमकवण्यापर्यंत आहेत उपयोग - (Lemon Peel are also useful for your Utensils)
अनेकदा चहा, कॉफीनंतर किंवा काही बनवण्यासाठी भांड्याचा गॅसवर वापर केल्यानं त्याच्यावर काळा थर जमा होतो. हा थर काढण्यासाठी लिंबाच्या सालीचा वापर केला जाऊ शकतो. जेवणाच्या भांड्याला अनेकदा आतून चिवटपणा रहातो. साबणानंही तो जात नाही. अशा वेळी जर लिंबाच्या सालीचा वापर करून ती भांडी घासली तर चिवटपणा लगेच निघून जातो. कुकरमध्ये भात शिजवताना कुकर आतून काळा पडतो. अशावेळी त्यात पाण्यासोबत लिंबाची एक साल देखील ठेवावी. यामुळं कुकर आतून काळा होत नाही. 


स्वच्छतेचा रामबाण उपाय म्हणजे लिंबाच्या साली - (Lemon Peels are Useful for Cleaness) 
फ्रिजमध्ये जर दुर्गंध येत असेल तर लिंबाच्या साली ठेवाव्यात. सालींच्या वासामुळं फ्रीजमधील दुर्गंधी कमी होते. घरात मुंग्या येत असतील तर ज्या ठिकाणाहून त्या जातात तिथे लिंबाची साल ठेवावी. लिबांच्या सालीचा वापर तुम्ही नखं स्वच्छ करण्यासाठी देखील करू शकता. हातांचे कोपरे काळवंडले असतील तर त्या ठिकाणी लिंबाच्या सालीनं मसाज करावी. 


(Disclaimer : वर दिलेली माहिती ही सामान्य ज्ञान आणि घरगुती उपायांवर आधारित आहे. ZEE 24 Taas याची खात्री करत नाही.)