Tips To Keep Diabetes Under Control: डायबिटीज म्हटलं की अनेक आजारांना निमंत्रण असतं. त्यामुळे डायबिटीज नकोच, असं प्रत्येकाला वाटतं. कारण एकदा का डायबिटीज झाला, तर अनेक गोष्टींवर बंधनं येतात. जर तुम्हाला डायबिटीज झाला तर दैनंदिन जीवनात काही बदल करणं गरजेचं आहे. प्रत्येक डायबिटीज रुग्णाचा आहार वेगळा असतो. आज आम्ही तुम्हाला सारखेची पातळी नियंत्रणात ठेवण्याासाठी काही महत्त्वाची माहिती देणार आहोत. यामुळे तुमच्या रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत होईल. चला तर मग जाणून घेऊयात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सकाळी साखरेची पातळी तपासा: जर तुम्हाला डायबिटीज असेल तर दररोज रक्तातील साखरेची पातळी तपासणं आवश्यक आहे. हा रोजच्या सवयीचा भाग असला पाहीजे. रोज सकाळी खाण्यापूर्वी रक्तातील साखर चेक करा. तुमच्या रोजच्या दिवसाच्या तुमच्या कसा परिणाम होतो? याबाबत माहिती मिळेल.


वेळेवर औषध घ्या: डायबिटीज रुग्णांनी वेळेवर औषध घ्यावे. बरेच लोक इन्सुलिनची काळजी घेत नाहीत, त्यामुळे त्यांच्या रक्तातील साखरेची पातळीत चढ-उतार होत असतो. लोकांचा गैरसमज आहे की, औषध घेतल्याने वजन वाढते, पण तसे नाही. औषधोपचारांसह निरोगी दिनचर्याचे पालन केल्याने तुमची साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होईल.


रोज ३० मिनिटे व्यायाम करा: शारीरिक हालचालींद्वारे तुम्ही रक्तातील साखर नियंत्रित करू शकता. जेव्हा तुम्ही सक्रिय असता तेव्हा पेशी साखरेची पातळी कमी होते. शरीरातील इन्सुलिनची पातळी योग्यरित्या कार्यरत ठेवण्यासाठी व्यायाम करणे खूप महत्वाचे आहे.


झोपण्यापूर्वी साखरेची पातळी तपासा: झोपण्यापूर्वी तुम्ही साखरेची पातळी तपासली पाहिजे. साखरेची पातळी तपासल्यानंतर, आपण दिवसभरात साखरेची पातळी योग्यरित्या नियंत्रित केली की नाही याचा अंदाज येईल.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अवलंबण्यापूर्वी, वैद्यकीय सल्ला जरूर घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)