Summer White Onion Benefits in Marathi : राज्यात तापमान वाढत असून दिवसेंदिवस सूर्य आग ओकतोय. उन्हाळ्यात सूर्य डोक्यावर आल्यानंतर बाहेर पडणं कठीण होऊन जातंय. अशात उष्णघातपासून संरक्षणासाठी भरपूर प्रमाणात पाणी पिण्याचा सल्ला आहार तज्ज्ञ आणि डॉक्टर देतात. पाणीयुक्त फळ आणि शरीराचं तापमान थंड ठेवण्यासाठी आहारावर लक्ष द्यावं असं सांगण्यात येतं. अशामध्ये एक प्रश्न आवर्जून पडतो की, उन्हाळात पांढरा की लाल कुठला कांदा खावा. (Health Tips Which onion to eat red or white in summer White Onion Benefits in Marathi )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्वयंपाक घरातील एक अविभाज्य घटक आणि जेवण्याची चव वाढवणारा कांदा आवश्यक असतो. बाजारात उन्हाळात लाल आणि पांढरा दोन्ही कांदे उपलब्ध असतात. अशात लाल आणि पांढरा या दोन कांद्यात फरक काय आहे? शिवाय उन्हाळात कुठला कांदा खाल्ल्यास आपल्या शरीराला खूप फायदेशीर हे याबद्दल जाणून घ्या. 


पांढऱ्या आणि लाल कांद्यामध्ये काय फरक आहे?


लाल कांदा आणि पांढरा कांदा यांमध्ये साम्य असल्या तरी दोन्हीच्या गुणधर्मात फरक आहे. पांढऱ्या कांद्यामध्ये लाल कांद्यापेक्षा जास्त अँटीबायोटिक आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात. तर पांढऱ्या कांद्यामध्ये लाल कांद्यापेक्षा जास्त कॅलरी आणि कमी फायबर उपलब्ध आहे. पांढऱ्या कांद्यात कॅल्शियम आणि लोहाचे प्रमाण कमी असतं. त्यामुळे लालपेक्षा पांढरा कांदा हा गुणकारी आहे. 


पांढरा कांद्याचे आरोग्यदायी फायदे!


सेलिब्रिटी शेफ संजीव कपूर यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पांढऱ्या कांद्याचे फायदे सांगितलंय. पांढरा कांदा सनस्ट्रोक आणि सनबर्न सारख्या समस्यापासून तुमच्या बचाव होतो. 


पांढऱ्या कांद्यामध्ये फ्रक्टन्स नावाचे निरोगी विद्रव्य फायबर आढळतं. ते आपल्या तंतू पाचक आरोग्याला चालना देण्यासाठी आणि आतड्यांसंबंधी-निरोगी जीवाणू वाढविण्यास फायदेशीर ठरतं. पांढरा कांदा खाल्ल्यामुळे अनेक आतड्यांसंबंधी रोगांपासून बचाव होतो. 


हेसुद्धा वाचा - पपईचा बिनकामाचा म्हणून फेकला जाणारा 'हा' भाग सर्वात महाग; आरोग्याच्या अनेक समस्यांवर ठरतो जालीम उपाय


पांढरा कांदा एक उत्कृष्ट शीतकरण एजंट असून हे शरीराचे तापमान कमी फायदेशीर ठरतं. याशिवाय पांढरा कांदा उन्हामुळे होणारी जळजळ कमी करण्यास मदत करतो. 


त्याचे दाहक-विरोधी गुणधर्म शरीरातील रक्तदाब पातळी नियंत्रित ठेवण्यास फायदेशीर आहे. 



पांढऱ्या कांद्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असल्याने तो डिटॉक्सिफिकेशनसाठी एक उत्तम घटक मानला जातो. 


पांढऱ्या कांद्यामधील बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा गुणधर्म असल्याने उन्हाळ्यात होणाऱ्या अनेक आजारांपासून आपलं संरक्षण होते. त्यासोबत पांढरा कांदा कॉलरा आणि अनेक संक्रमणांना रोखण्यासाठी प्रभावी ठरतो, हेही अनेक अभ्यासातून सांगण्यात आलंय. 


(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)