Homemade Drinks To Heal Stomach Pain: काहीवेळा खराब अन्नामुळे आपले पोट बिघडते आणि दुखू लागते. या स्थितीत वेदना जाणवू शकतात तसेच संसर्गासारख्या समस्या देखील उद्भवू शकतात. परंतु या काळात आपण औषधांवर अवलंबून असतो आणि कोणत्याही प्रकारचे घरगुती उपाय करत नाही. पण या काळात तुम्ही काही घरगुती पेयांचे सेवन करु शकता, ज्यामुळे तुम्हाला काही वेळात आराम मिळेल. आम्ही तुम्हाला येथे सांगतो की तुम्हाला पोटाची समस्या असल्यास तुम्ही कोणते पेय जरुर प्यावीत.


पोटाशी संबंधित समस्या असल्यास या पेयांचे सेवन कराच


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मसालेदार दही - 
पोटाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी दही खूप फायदेशीर आहे. दही खाण्यासाठी एक कप ताजे दही घ्या. आता त्यात जिरेपूड आणि काळे मीठ टाका. यानंतर हे दोन्ही दह्यामध्ये चांगले मिसळून प्या. असे केल्याने पोटाशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळेल. कारण दह्यामध्ये चांगले बॅक्टेरिया असतात, त्यामुळे तुमचे पोट बरोबर राहते. त्यामुळे जर तुम्हाला पोटाशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर तुम्ही रोज दह्याचे सेवन करावे.


बडीशेप चहा-
बडीशेप चहा पोटाच्या समस्यांवर उपचार करण्यास देखील मदत करू शकते. बडीशेप चहा प्यायल्याने पोटाची जळजळ टाळता येते. कारण बडीशेप चहामध्ये एन्झाईम्स असतात. ते अन्नातील पोषकद्रव्ये चांगल्या प्रकारे शोषण्यास मदत करतात. यामुळे पचनक्रिया सुधारते.हे करण्यासाठी पाणी उकळायला ठेवा. आता त्यात एक चमचा बडीशेप आणि दोन चमचे तुळशीची पाने टाका. आता ते चांगले उकळू द्या, नंतर ते गाळून प्या.


(अस्वीकरण: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा अवलंबण्यापूर्वी, वैद्यकीय सल्ला जरुर घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)