How Much Steps A Person Should Walk Daily: आपले वाढते वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी आपण विविध उपाय करतो. चालणे हा त्यापैकी एक आहे. निरोगी आणि तंदुरुस्त राहण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. दररोज चालण्याचे आपल्या शरीराला अनेक फायदे आहेत. विशेषत: पोट आणि कंबरेची चरबी कमी करण्यात खूप मदत होते. सकाळी आणि अनेकदा रात्रीच्या जेवणानंतर फेरफटका मारण्याचा सल्ला दिला जातो. पण हा प्रश्न आपल्या मनात अनेकदा येतो की सपाट पोट होण्यासाठी दिवसभरात किती चालावे लागते. याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या. 


वजन कमी करण्यासाठी चालणे चांगले


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर तुम्ही दररोज चालत असाल तर वजन कमी (Weight Loss) करणे सोपे होते आणि पोटावरील चरबी कमी होण्यास देखील मदत होते. जर तुम्हाला चांगले परिणाम हवे असतील तर सामान्य चालण्याऐवजी वेगाने चालण्याची सवय लावा. जे लोक 8 ते 10 तास ऑफिसमध्ये बसून काम करतात त्यांना कोरोनरी आर्टरी डिसीज, ट्रिपल वेसल डिसीज आणि हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते. शारीरिक हालचाली कमी केल्याने उच्च कोलेस्टेरॉल आणि लठ्ठपणा वाढतो. त्यामुळे शरीराची हालचाल वाढवण्यावर भर दिला पाहिजे.


अभ्यासात मोठी माहिती पुढे


कॅनडात केलेल्या एका अभ्यासानुसार, ज्या महिला साडेतीन महिने दररोज सुमारे एक तास चालतात आणि आहारात कोणताही बदल न करता त्यांच्या पोटाची चरबी 20 टक्क्यांनी कमी करु शकतात. म्हणूनच तुम्ही अधिकाधिक चालण्याचा प्रयत्न करा, कारण जास्त वेळ बसल्याने शरीराला खूप नुकसान होते.


एका दिवसात किती चालले पाहिजे?


चालणे हा एक उत्तम व्यायाम आहे, जर तुम्हाला लठ्ठपणा वाढू नये आणि तुम्हाला हृदयाशी निगडीत आजारांचा धोका नको असे वाटत असेल, तर त्यासाठी तुम्ही किमान 10 हजार पावले चालली पाहिजेत, जर तुम्ही दररोज एवढी मेहनत केली तर तुमच्या आरोग्याचे अनेक आश्चर्यकारक फायदे होतील, काही आठवड्यांत त्याचा परिणाम दिसून येईल.


चालण्याचे इतर फायदे


चालण्यामुळे तुमची पचनक्रिया आणि चयापचय क्रिया चांगली राहते, यामुळे तुमचे शरीर सक्रिय राहते ज्यामुळे जडपणाची समस्या येत नाही, याशिवाय यामुळे आपले मानसिक आरोग्यही सुधारते, त्यामुळे रोज चालण्याची सवय लावा.