मुंबई : अनियमित जीवनशैली आणि चुकीचा आहार यामुळे सध्या अनेक आजारांना आपणच निमंत्रण देतोय. यामधीलच एक समस्या म्हणजे मुळव्याध. शरीरातील गुदाशय आणि गुदद्वार या भागातील रक्तवाहिन्यांच्या आजाराचा एक प्रकार असतो. यामध्ये गुदद्वाराच्या आतील आणि बाहेरील रक्तवाहिन्यांना सूज येते. यामुळे वेदनादेखील होतात आणि काहीवेळा रक्तस्त्राव देखील होतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाईल्सच्या त्रासाने ग्रस्त असलेल्या रुग्णांनी खाण्यापिण्याच्या सवयीकडे बारीक लक्षं दिलं पाहिजे. असं न केल्यास पाईल्सचा त्रास अधिक वाढण्याची शक्यता असते. जाणून घेऊया खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे.


मसालेदार पदार्थ कमी खावेत


बर्‍याच लोकांना मिरची आणि मसालेदार पदार्थ खाणं फार आवडते, परंतु पाईल्सचा त्रास असलेल्या रुग्णांना हिरवी किंवा लाल मिरची खाणं टाळावं. कारण यामुळे अधिक त्रास होण्याची शक्यता असते.


व्यसन करू नये


पाईल्सच्या रुग्णांसाठी व्यसन धोकादायक ठरू शकते. सुपारी, गुटखा, पान मसाला यांचं सेवन टाळालं पाहिजे. पाईल्सच्या रूग्णांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की ड्रग्सची व्यसनाची सवय लागल्यानंतर पोट व्यसन केल्याशिवाय साफ होत नाही. अशा परिस्थितीत जर एखाद्या व्यक्तीला व्यसन लागलं असेल तर पाईल्सची गंभीर होऊ शकते.


बाहेर खाणं टाळा


पाईल्सचा त्रास असलेल्या रुग्णांनी बाहेरील खाद्यपदार्थापासूनही दूर रहावं. हॉटेल्स किंवा रेस्टॉरंटमध्ये मिळणाऱ्या अन्नात मसाला आणि तेलाचं प्रमाण अधिक असतं. ज्यामुळे पचनक्रिया बिघडण्याचा धोका असतो. त्याचबरोबर, अशा लोकांनी मांस खाणं देखील टाळावं. कारण मांसाहारी जे काही शिजवलं जातं त्याची चव मसाल्यांमुळेच असते.


पाईल्सच्या रूग्णांनी या गोष्टींचं सेवन करावं


पाईल्सचा त्रास असलेल्या रुग्णांनी हिरव्या पालेभाज्या खाव्यात, कारण त्यात भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट आणि पोषक घटक असतात. पालेभाज्या खाल्ल्याने पचनकार्य सुधारतं. तसंच या रुग्णांनी पालक, कोबी, शतावरी, फुलकोबी, काकडी, गाजर, कांदा इत्यादी भाज्याही खाल्ल्या पाहिजेत. याशिवाय त्यांनी दररोज किमान 3-4 लीटर पाणी प्यावं. कारण जास्त पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात.