वर्किंग वूमन्ससाठी आहाराच्या खास टिप्स...
आजकाल बहुतांश स्त्रिया कामानिमित्त बाहेर असतात.
नवी दिल्ली : आजकाल बहुतांश स्त्रिया कामानिमित्त बाहेर असतात. कुटुंब आणि ऑफिस दोन्ही अगदी व्यवस्थित सांभाळतात. मात्र या सगळ्या जबाबदारीच्या चक्रात स्वतःकडे फारसे लक्ष दिले जात नाही. स्त्रियांना घर आणि ऑफिसचा डोलारा लिलया पार पाडायचा असेल तर तुम्हाला स्वतः फिट, हेल्दी असणे गरजेचे आहे. त्यासाठी योग्य आहार योग्य वेळी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी काही टिप्स..
हा टिप्स पाळल्यास तुम्हाला दिवसभर एनर्जेटीग वाटेल.
नाश्ता
सकाळच्या घाईत नाश्ता करणे, अनेकजणी टाळतात. पण सकाळचा नाश्ता हा आरोग्यासाठी आवश्यक असतो. तो टाळल्यास आरोग्याचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे नाश्ता टाळू नका. शक्यतो घरगुती पदार्थ नाश्तासाठी उ्त्तम. तुम्ही कॉर्नफ्लेक्सही घेऊ शकता. ते शक्य नसल्यास प्रवासात एखादे फळ खा किंवा फळांचा रस घ्या. त्यामुळे संपूर्ण दिवस तुमच्या शरीराला ऊर्जा मिळते. ऑफिसमध्ये मधल्या वेळी भूक लागल्यास सुकामेवा खा.
दुपारचे जेवण
दिवसभर ऑफिस आणि इतर अनेक कामे करत असल्याने जेवणातून पोषण होणे गरजेचे आहे. त्यासाठी सात्विक, पौष्टीक अन्नपदार्थांचा आहारात सामावेश करा. शक्यतो घरचे अन्न खा. पोळी-भाजी, डाळ, दही, हिरव्या पालेभाज्या यांसारखे पदार्थ तुम्ही आहारात घेऊ शकता. त्याचबरोबर सलाड अवश्य खा.
स्नॅक्स
८-९ तास ऑफिसमध्ये असल्याने संध्याकाळच्या वेळेसही भूक लागते. अशावेळी बाहेरचे अरबट चरबट खाले जाते. समोसा, वडा अशा अनहेल्दी पदार्थांची पोटात भर पडते. अशावेळी सुकामेवा, उकडलेली कडधान्ये, कडधान्यांचे सलाड अशा पदार्थांचा आस्वाद घ्या. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळेल.
रात्रीचे जेवण
भारतात रात्रीचे जेवण पोटभर घेण्याची सवय आहे. इतकंच नाही तर पोटभर खायचं आणि लगेच झोपायचं, ही अगदी अनहेल्दी सवय. या उलट रात्री कमी मसालेदार, हलके अन्न घ्या. भाज्या, चपाती, वरण, भात असे हलके अन्न घ्या. त्यामुळे शरीराचे पोषण तर होईलच पण अन्नपचन सहज होईल.