Relationship Tips: सध्या रिलेशनशिप अनेकदा कॉप्लिकेटेड झालेली पाहायला मिळते. सध्या रिलेशनशिपही बदलताना दिसते आहे. अनेकदा छोट्या मोठ्या कारणांवरून वादही होताना दिसतो. आपल्या रिलेशनशिपमध्ये येणारी ही चढाओढ जर का दूर करायची असेल तर आपल्याला त्याप्रमाणे आपल्या रिलेशनशिपला अधिक मजबूत (How to Improve Relationship) करणेही गरजेचे असते. तेव्हा तुमच्यात नात्यात जर का दुरावा आला असेल तर तुम्हाला काही टीप्स फॉलो कराव्या लागतील तेव्हा या लेखातून जाणून घेऊया की नक्की नात्यात दुरावा येण्याची लक्षणे कोणती आणि त्यावर तुम्ही कशी मात करू शकाल. रिलेशनशिप हेल्थी बनवायची असेल तर तुम्हाला काही गोष्टींची दखल घेणे आवश्यक ठरेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या कामाच्या तणावामुळेही नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो तेव्हा अशावेळी त्यासंदर्भात योग्य ती काळजी घेणे हे गरजेचे असते. आपला घरातला ताण हा आपल्या नात्यावर येऊ नये म्हणून आपल्याला वर्क लाईफ आणि पर्सनल लाईफ यांच्यात योग्य तो समन्वय राखणं गरजेचे आहे. संवाद हा आपल्या नात्याला अधिक मजबूत करतो तेव्हा आपल्यालाही त्याबद्दल योग्य ती काळजी घेणे आवश्यक असते. आपले शब्द चुकले तर समोरचा माणूस हा दुखावलाही जाऊ शकतो. तेव्हा संवादाचे माध्यमंही तुमचे नातं तोडायला अथवा जोडायला मदत करते.


नात्यातील दुराव्याची नक्की कारणं कोणती? 


  • तुमचा पार्टनर जरा का तुमच्यावर सतत चिडचिड करत असेल तर तुमच्या नात्यात काहीसा दुरावा येऊ लागला आहे. 

  • तुमचा पार्टनर तुमच्याापासून काहीतरी लपवतोय. म्हणजेच तुमचा पार्टनर इतर काही गोष्टींना प्राधान्य देतो आहे. 

  • तुमच्यासाठी तुमचा बॉयफ्रेंड अथवा गर्लफ्रेंड वेळ देत नाही याचा अर्थ तिच्या आयुष्यात कोणतरी दुसरं आलाय असा संशय तुम्हाला येणं साहजिकच आहे. तेव्हा यामुळे तुमच्या नात्यात दुरावा येऊ शकतो. 

  • तुम्ही एकमेकांना स्पेस देत नसाल, अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करत असाल तर तुमच्या नात्यात दुरावा येऊ शकतो. 


काय टीप्स फॉलो कराल? 


  • एकमेकांना स्पेस द्या. तुम्हाला एकमेकांशी संवाद साधणंही आवश्यक आहे. 

  • त्याचसोबत आवर्जून एकमेकांसोबत वेळ घालवा. 

  • आपल्या आवडत्या व्यक्तीला त्यांच्या आवडती भेटवस्तू द्या. 

  • त्याचसोबत त्याच्यांसाठी कष्ट घ्या. त्यांच्या कामात त्यांना मदत करा. 

  • एकमेकांची सुख आणि दु:ख शेअर करा. 


हे टीप्स फॉलो केल्यानं तुम्हाला तुमचे नाते पुन्हा मुळ पदावर आणण्यास मदत होऊ शकते. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)