Iron : तुमच्या शरीराला लोहाची गरज किती आहे? जाणून घ्या!
आयर्नच्या कमतरतेमुळे अनेक समस्या उद्भवू शकतात.
मुंबई : व्यक्तीला त्याच्या शरीरासाठी आयर्न सर्वात महत्वाचं असतं आहे. त्याच्या कमतरतेमुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. मात्र तुम्हाला कल्पना आहे का, आयर्न म्हणजेच लोहाच्या जास्त प्रमाणात शरीरात विविध प्रकारचे विकार होऊ शकतात. जेव्हा तुम्ही खूप जास्त आयर्न साठवूता तेव्हा ते तुमच्या अवयवांचे नुकसान करू लागतं. त्याचबरोबर अनेकवेळा रक्तसंक्रमणामुळे थॅलेसेमियाच्या रुग्णांमध्ये इतरही समस्या उद्भवू शकतात. भारतात अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, ज्यामध्ये लोहाचं प्रमाण जास्त आहे.
ब्रेन कनेक्शनवर वाईट परिणाम
आपल्यापैकी बर्याच जणांनी आतडे-मेंदू कनेक्शन किंवा आतड्यांसंबंधी मज्जासंस्थेबद्दल अनेकांना माहिती असेल. जेव्हा आपल्या आतड्यात बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे समस्या उद्भवते तेव्हा चिंता आणि नैराश्य यासारखी लक्षणंही उद्भवू शकतात. त्यामुळे जास्त आयर्नच्या तुमच्या ब्रेन कनेक्शनवरही परिणाम होतो.
रक्तदान करा
ज्या महिलांना अजूनही मासिक पाळी सुरू आहे त्यांनी वर्षातून एकदा किंवा दोनदा रक्तदान केलं पाहिजे. रजोनिवृत्तीनंतर महिला हे वर्षातून तीन ते चार वेळा करू शकतात.
फोर्टिफाइड पदार्थ टाळा
केक, ब्रेड आणि मैदा यांचं सेवन कमी करण्याचा प्रयत्न करा. अधिक मिनरल्सचं सेवन केल्याने प्रोटीनचा समतोल राखला जातो. तुम्ही आयर्न आणि मॅग्नेशियम समृद्ध फळं आणि भाज्यांचे सेवन करू शकता.
आयर्नचं किती प्रमाणात सेवन केलं पाहिजे?
प्रत्येक व्यक्तीच्या शरीरानुसार आयर्न म्हणजेच लोहाची गरज वेगवेगळी असते. लोहाचे सेवन वय आणि क्रियाकलापांच्या प्रमाणात मोजलं जातं. त्याच वेळी, मासिक पाळीच्या स्त्रियांना 20 ते 25 ग्रॅम लोह आवश्यक आहे. इतर महिलांच्या तुलनेत गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या महिलांना दररोज 5 मिलीग्राम लोह आवश्यक असतं.