मुंबई : सध्याच्या युगात बदलत्या जीवनशैलीमुळे लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ज्यामुळे वेगवेगळे आजार होत आहेत. व्यायाम न करणं आणि आहार यामुळे समस्या निर्माण होत आहेत. बीपी, मधुमेह, कर्करोगासारखे आजार वाढत आहेत. आता ब्लड प्रेशरचा त्रास तर तरुणांनाही होत असल्याचं दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुमच्या घरात जर कोणाला ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर त्यांच्या आहारात नक्की या फळांचा समावेश करा. जरी ब्लड प्रेशरचा त्रास नसेल तरीसुद्धी तुम्ही ही तीन फळ खाल्ली तरी तुम्हाला फायदा होऊ शकतो. ती तीन फळं कोणती आहेत जाणून घेऊया. 


1. केळ- बाराही महिने तुम्ही केळ खाऊ शकता. अत्यंत पौष्टीक असतं. केळ पचनासाठी चांगलं असतं. त्यातील घटक हे ब्लड प्रेशर मेंटेन ठेवायला मदत करतात. स्ट्रोकसाठीही अत्यंत फायदेशीर फळ आहे. याशिवाय फायबर असल्याने पोटाच्या समस्या दूर होतात.


2 किवी- या फळामध्ये अनेक Nutritional घटक असतात. त्यातील पौष्टिक तत्व शरीरासाठी फायदेशीर असतात. टी ऑक्सिडेंट्स आणि मिनरल्सचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे पचनासाठी उत्तम मानलं जातं. इम्युनिटी बुस्टर म्हणून हे फळ काम करतं. 


3 आंबा- उन्हाळ्यात मिळणारे हे फळ केवळ चवीसाठीच नाही तर अनेक आजारांना दूर ठेवण्याचे काम करते. विशेष म्हणजे ब्लडप्रेशरच्या समस्येने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी आंबा खाणे खूप फायदेशीर आहे, त्यात आढळणारे बीटा कॅरोटीन आणि फायबर हे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत, हे दोन घटक बीपी नियंत्रणात ठेवण्याचे काम करतात. 


(Disclaimer : इथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ते अवलंबण्यापूर्वी, डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. झी 24 तास या माहितीची कोणतीही खातरजमा करत नाही.)