High Cholesterol Effects On Eyes :  कोलेस्ट्रॉलच्या समस्येमुळे (Cholesterol) अनेकांना विविध शारिरीक समस्यांना सामोर जावं लागत आहे. कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो (heart attack)  तसेच वजन वाढण्याचीही भिती असते. मात्र, आता हाय कोलेस्ट्रॉलचा आणखी एक धोका समोर आला आहे. हाय कोलेस्ट्रॉलमुळे अंधत्व येऊ शकते असं एका संशोधनातुन समोर आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोलेस्‍ट्रॉल म्‍हणजे चरबीसारखा एक पदार्थ असतो जो आपल्या शरीरातील फॅट्स वाढवतो. कोलेस्टेरॉल दोन प्रकारचे असतात. हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन अर्थात गुड कोलेस्टेरॉल (Good Cholesterol) आणि लो डेन्सिटी लिपोप्रोटीन अर्थात बॅड कोलेस्टेरॉल (Bad Cholesterol) असे कोलेस्टेरॉलचे दोन प्रकार आहेत.


गुड कोलेस्टेरॉल  हृदयविकाराच्या रुग्णासाठी फायदेशीर असतं. कारण यामुळे हृदयविकाराच्या झटक्याचा धोका कमी होतो. कारण यात हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन म्हणजेच एचडीएलची (HDL) पातळी वाढलेली असते. तर, बॅड कोलेस्टेरॉल अत्यंत घताक असतं. बॅड कोलेस्टेरॉल रक्तवाहिन्यांच्या वॉलमध्ये (Wall) जमा होतं. यामुळे हृदयविकाराचा झटक येण्याटी (Heart Attack) किंवा ब्रेन स्ट्रोक होण्याची तसेच पक्षाघात होण्याची भिती असते. 


हाय कोलेस्ट्रॉलचा आणखी एक धोका समोर आला आहे. हाय कोलेस्ट्रॉलमुळ डोळ्यांची दृष्टी जाऊन अंधत्व येवू शकते. जेव्हा कोलेस्टेरॉलची पातळी वाढते तेव्हा डोळ्याभोवती काही बदल दिसतात. यामुळे या धोक्याते संकेत आधीच मिळतात. डोळ्यांचा रंग बदलल्याचे जाणवते. डोळ्याची दृष्टी कमी होते अशी लक्षण जाणवल्यास या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करु नका.


हाय कोलेस्ट्रॉलचा डोळ्यांवर कसा परिणाम होतो?


Xanthelasma हे उच्च कोलेस्टेरॉलचे सर्वात सामान्य लक्षण मानले जाते. यामुळे डोळे आणि नाकाच्या आजूबाजूची त्वचा पिवळी पडू लागते. याचा तुमच्या दृष्टीवर परिणाम होत नाही. जे लोक धूम्रपान करतात किंवा ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब आणि लठ्ठपणा आहे त्यांना या समस्येचा सर्वाधिक सामना करावा लागतो. या समस्येला डोळ्यांवर कोलेस्टेरॉल जमा होणे असेही म्हणतात. हे कोलेस्टेरॉल पापण्यांच्या वरच्या आणि खालच्या भागात दिसू शकते. डोळ्याभोवती कोलेस्टेरॉलचे अनेक दाणे दिसतात.


आर्कस सेनिलिस 


आर्कस सेनिलिस किंवा कॉर्नियल आर्कस म्हणजे डोळ्यांच्या कॉर्नियाभोवती निळ्या किंवा राखाडी रंगाची वर्तुळ तयार होतात. हे कॉर्नियामध्ये कोलेस्टेरॉल जमा झाल्यामुळे होते आणि मुख्यतः मध्यमवयीन लोकांमध्ये आढळते. डोळ्यांभोवती जमा झालेले कोलेस्टेरॉल शस्त्रक्रियेने काढून टाकून त्यावर उपचार करता येतात. रेटिनल वेन ऑक्लूजन - रेटिनल वेन ऑक्लूजन हा एक आजार आहे जो थेट उच्च कोलेस्टेरॉलशी संबंधित आहे. हे सहसा काचबिंदू, मधुमेह, रक्तवहिन्यासंबंधी रोग, उच्च रक्तदाब आणि रक्त विकारांसह होते. या आजारामुळे रेटिनामध्ये रक्त वाहून नेणाऱ्या रक्तपेशी ब्लॉक होतात. यामुळे डोळ्याची दृष्टी कमी होऊन अंधत्व येण्याचा धोका असतो.