मुंबई : एखाद्याच्या शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यास उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक यांसारख्या अनेक गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो. ज्यामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो. मुळात शरीरात दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल असतात, चांगलं कोलेस्ट्रॉल ज्याला एचडीएल कोलेस्ट्रॉल असंही म्हणतात. तर दुसरं बॅड कोलेस्ट्रॉल, ज्याला एलडीएल कोलेस्ट्रॉल म्हणतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोलेस्ट्रॉल हा मेणासारखा एक घटक असतो जो, कोणत्याही व्यक्तीच्या रक्तात आढळून येतो. जेव्हा रक्तातील चांगलं कोलेस्ट्रॉल कमी होतं आणि वाईट कोलेस्ट्रॉल वाढू लागतं तेव्हा रक्तवाहिन्या खराब होतात, ज्यामुळे गंभीर आजार देखील वाढतात.


खराब कोलेस्टेरॉल कमी करण्याचे प्रभावी उपाय


जर तुम्हाला वाईट कोलेस्ट्रॉल कमी करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या आरोग्याची आणि खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. यामध्ये तुम्हाला तुमच्या अनेक सवयी आणि खाणं-पिणं स्वतःपासून दूर कराव्या लागतील. या सवयी बदलल्या नाहीत, तर त्याच्याशी झगडणाऱ्या व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो. जर वेळेत या सवयी बदलल्या तर पुढची जीवनशैली निरोगी आणि आनंदी होईल.


  • गरजेनुसार व्यायाम करा. यासोबतच चालणं, पोहणं, धावणं, सायकल चालवणं यासारखे सोपे व्यायाम केल्याने कोलेस्टेरॉल कमी होतं.

  • दारू आणि धूम्रपान पूर्णपणे सोडून द्या

  • सकस आणि पौष्टिक अन्न घ्या. 

  • बाहेरचे पदार्थ खाणं टाळा, घरचे पदार्थ खा

  • फळं आणि विशेषतः हिरव्या भाज्यांना आहाराचा भाग बनवा

  • मधुमेह, लठ्ठपणा आणि जास्त वजन व्यवस्थापित करा

  • जेवणातील मिठाचं सेवन कमी केल्याने बेडमधील कोलेस्ट्रॉलही कमी होईल.