High cholesterol : शरीरात `हे` 4 बदल दिसल्यास समजा रक्तामध्ये वाढलंय कोलेस्ट्रॉल
Signs of high cholesterol : चुकीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येक व्यक्तींला व्यायाम ( Exercise ) करणं शक्य होत नाही. अशातच चुकीच्या आहारामुळे कमी वयातच लोक कमी वयातच अनेकांमध्ये वाढत्या कोलेस्ट्रॉलची ( high cholesterol ) समस्या दिसून येतेय.
Signs of high cholesterol : प्रत्येकाची इच्छा असते की, आपण फीट आणि फाईन रहावं. शरीर निरोगी ठेवण्यासाठी हृदय निरोगी ( Healthy Heart ) ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. मात्र चुकीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येक व्यक्तींला व्यायाम ( Exercise ) करणं शक्य होत नाही. अशातच चुकीच्या आहारामुळे कमी वयातच लोक कमी वयातच अनेकांमध्ये वाढत्या कोलेस्ट्रॉलची ( high cholesterol ) समस्या दिसून येतेय.
कोलेस्टेरॉल वाढल्यामुळे हार्ट अटॅकसोबत ( Heart Attack ) स्ट्रोक, मधुमेह यांसारख्या आजारांचा धोकाही अनेक पटींनी वाढतो. शरीरात दोन प्रकारचे कोलेस्टेरॉल असतात. यामध्ये एक चांगलं कोलेस्ट्रॉल आणि दुसरं वाईट कोलेस्ट्रॉल ( high cholesterol ). आपल्या शरीरात ज्यावेळी वाईट कोलेस्ट्रॉल वाढतं, तेव्हा काही संकेत दिसून येतात. जाणून घेऊया हे संकेत काय असतात?
कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर शरीरात दिसतात 'हे' 5 बदल
शरीरातील कोलेस्टेरॉल वाढल्यामुळे अनेकदा डोकेदुखीची समस्या उद्भवते. त्यामुळे जर सतत तुम्हाला तुमचं डोकं जड वाटत असेल तर हे कोलेस्ट्रॉल वाढण्याचं लक्षण असू शकतं.
जर तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला किंवा सतत श्वास फुलू लागला तर ते उच्च कोलेस्ट्रॉलचे लक्षण असू शकते.
जर तुम्हाला अचानक तुमचं वजन वाढलेलं वाटत असेल तर हे देखील वाढलेल्या कोलेस्ट्रॉलचं लक्षण असू शकतं. यामुळे तुम्हाला सतत थकवा देखील जाणवू शकतो.
छातीत अचानक भरपूर वेदना होणं वाढलेल्या कोलेस्ट्रॉलचं लक्षणं असू शकतं.
कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवायचं असल्यास आहारात या पदार्थांचा समावेश करा
ओट्स ( oats )
उच्च कोलेस्ट्रॉलच्या समस्येवर ओट्स फायदेशीर ठरतात. ओट्समध्ये बीटा ग्लुकन असते जे शरीरात खराब कोलेस्ट्रॉल जमा होऊ देत नाही.
अक्रोड ( walnut )
कॅल्शियम, मॅग्नेशियम, ओमेगा-3, फायबर, कॉपर आणि फॉस्फरस यांसारख्या पोषक घटक अक्रोडमध्ये असतात. त्यामुळे अक्रोड खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वितळण्यास सुरुवात होते.
लिंबू ( lemon )
व्हिटॅमिन सी समृद्ध लिंबू एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी करण्यास उपयुक्त ठरतं. लिंबूवर्गीय फळांमध्ये काही फायबर असते, जे खराब कोलेस्टेरॉलला रक्तात जाण्यापासून रोखते.
लसूण ( garlic )
कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी लसूण प्रभावी ठरते. अनेकदा संशोधनातून असं दिसून आलंय की, दररोज लसूण खाल्ल्याने एलडीएल कोलेस्ट्रॉलची पातळी 9 ते 15 टक्क्यांनी कमी होते.