मुंबई : निरोगी पेशी तयार करण्यासाठी काही प्रमाणात कोलेस्टेरॉल आवश्यक आहे. मात्र, तुमचं कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रणाबाहेर गेलं तर ते धोकादायक ठरू शकतं. कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढल्याने हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोका वाढतो. जेव्हा उच्च कोलेस्टेरॉल आणि उच्च रक्तदाब यासह हृदयविकारांचा विचार केला जातो तेव्हा वैद्यकीय तज्ज्ञ विशेष आहार आणि व्यायामावर भर देतात. शरीराच्या काही भागांमध्ये वेदना हे उच्च कोलेस्टेरॉलचं लक्षण असू शकतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेयो क्लिनिकच्या मते, पेरिफेरल आर्टरी डिसिज (PAD) मुळे तुमच्या कंबरेत, मांड्या किंवा काल्फमधील स्नायूंना वेदना जाणवू शकतात. यामध्ये पाय किंवा हातांना पुरेसा रक्तपुरवठा होत नाही. त्यामुळे तुमच्या कोलेस्ट्रॉलच्या पातळीवर लक्ष ठेवणं फार महत्वाचं आहे. कारण हे एथेरोस्क्लेरोसिस एक मुख्य कारण आहे, ज्यामुळे पेरिफेरल आर्टरी डिसिज होतो. यामध्ये चालणं किंवा पायऱ्या चढणं यांसारख्या काही क्रिया केल्या तर वेदना आणखी वाढू शकतात.


या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका


कबंर, मांड्या किंवा काल्फच्या स्नायूंच्या वेदनादायक उबळांव्यतिरिक्त, इतर लक्षणं देखील आहेत जी पेरिफेरल आर्टरी डिसिज दर्शवू शकतात. 


  • पायांमध्ये अशक्तपणा किंवा सुन्नपणा

  • पायांवरील त्वचा चमकदार होणं

  • पायांची त्वचेचा रंग बदलणं

  • पायांच्या नखांची वाढ हळू होणं

  • पायाच्या बोटांवर फोड येणं

  • केस गळणं किंवा पायांवर केसांची वाढ कमी होणं


उच्च कोलेस्टेरॉलचा धोका कसा कमी करावा?


अनेक घटक उच्च कोलेस्टेरॉलचं कारण बनू शकतात. चुकीच्या जीवनशैलीपासून ते अनेक गोष्टींमुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिक सॅच्युरेटेड फॅट किंवा ट्रान्स फॅट घेण्याऐवजी हिरव्या भाज्या, फळं, फायबरयुक्त तृणधान्यं इत्यादींचा आहारात समावेश करावा.