मुंबई : कोलेस्टेरॉल (High Cholesterol) हा मेणासारखा पदार्थ आहे जो रक्तामध्ये आढळतो आणि रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊ लागतो. तसेच हाय कोलेस्टेरॉलमुळे (High Cholesterol Symptoms) रक्तवाहिन्यांचा सुरळीत रक्तप्रवाह अवरोधित होऊ लागतो, ज्यामुळे अनेक प्रकारच्या आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू लागतात. दरम्यान शरीरात हाय कोलेस्टेरॉल असल्यास कोणती लक्षणे जाणवतात व कोणत्या व्यक्तींना याचा सर्वाधिक धोका असतो, हे जाणून घेऊयात.  


लक्षणे काय? 


छातीत दुखते


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हृदयापर्यंत रक्त वाहून नेणाऱ्या नसांमध्ये जर कोलेस्टेरॉल (High Cholesterol) जमा झाले असेल तर छातीत दुखण्याची समस्या उद्भवू शकते. यामुळे, कधीकधी छातीवर हात ठेवल्यावर वेदना जाणवू शकतात किंवा वेळोवेळी तीव्र वेदना देखील होतात.


पाय दुखतात


हाय कोलेस्टेरॉलमुळे (High Cholesterol) पायांच्या रक्तवाहिन्यांपर्यंत रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे पायांपर्यंत रक्त नीट पोहोचत नाही, त्यामुळे चालताना त्रास होतो, पाय दुखतात आणि पायाच्या त्वचेचा रंग बदललेला दिसू शकतो. याशिवाय पाय खूप थंड होऊ शकतात.


हृदयात वेदना


छातीच्या कोणत्याही भागात दुखण्यासोबतच हृदयात दुखणे हेही कोलेस्टेरॉल (High Cholesterol Symptoms) वाढल्याचे लक्षण आहे. कोलेस्टेरॉलच्या जास्त प्रमाणामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक देखील येऊ शकतो.


'या' लोकांना सर्वाधिक धोका 


हाय कोलेस्टेरॉलची (High Cholesterol Symptoms) समस्या बहुतेकदा अशा लोकांमध्ये दिसून येते, ज्यांच्या आहारात पोषक तत्वांची कमतरता असते आणि जंक फूडचे प्रमाण जास्त असते.


शरीरात कोलेस्टेरॉल (High Cholesterol) जमा होण्याचे कारण पॅकबंद वस्तूंचे जास्त सेवन करणे देखील होऊ शकते.


कोणत्याही प्रकारचा व्यायाम न करणे आणि लठ्ठपणा हा देखील कोलेस्ट्रॉलचा (High Cholesterol) धोका आहे.


जे लोक धूम्रपान करतात आणि मद्यपान करतात त्यांना हाय कोलेस्ट्रॉलची (High Cholesterol) समस्या असू शकते.


(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. Z24 तास याची पुष्ठी करत नाही.)