मुंबई : काही वर्षांपूर्वींपर्यंत ऑलिव्ह ऑईल आपल्यासाठी एक्झॉटीक पदार्थांपैंकी एक होते. मात्र आता ऑलिव्ह ऑईलचे आरोग्यदायी फायदे जाणून घेतल्यानंतर त्याचा आहारातील समावेश वाढला आहे. आहारात जसा समावेश करणं फयाद्याचे आहे तसेच त्याचा वापर सौंदर्य खुलवण्यासाठीही केला जातो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑलिव्ह ऑईलमध्ये अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक मुबलक प्रमाणात असतात. सोबतच त्यामध्ये मिनरल्स, नॅचरल फॅटी अ‍ॅसिड असतात. यामुळे त्वचा मुलायम राहण्यास मदत होते..अकाली सुरकुत्या पडण्यापासून त्वचेचे रक्षण होते. 


मुलायम त्वचेसाठी खास स्क्रब - 


त्वचा मुलायम ठेवण्यासाठी ऑलिव्ह ऑईल फायदेशीर आहे. ऑलिव्ह ऑईल आणि मीठाचा वापर स्क्रब म्हणून केला जातो. त्वचेवरील मृत पेशींचा थर हटवण्यासाठी त्याचा फायदा होतो. मीठामध्ये अनेक प्रकारचे मिनरल्स असतात. यामुळे त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते.  


कसं बनवाल स्क्रब ? 


अर्धा कप ऑलिव्ह ऑईल 
1/4 कप मीठ  
लिंबाचा रस


सारे पदार्थ एकत्र करून  मिश्रण बनवा. त्वचेवर  हलक्या हाताने या मिश्रणाने मसाज करा. 5 मिनिटं स्क्रब चेहर्‍यावर लावून ठेवा. सुकल्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा. 


कोपरे, ढोपर, घोटा येथील काळसरपणा हटवण्यासाठीही हा स्क्रब फायदेशीर आहे. प्युमिक स्टोन पायावर घासल्यानंतर स्क्रबने मसाज करावा. रात्री झोपण्यापूर्वी  या स्क्रबचा वापर करा. त्यानंतर मॉईश्चरायझर लावून झोपा. त्वचेमध्ये मुलायमपणा टिकून ठेवण्यासाठी यामुळे मदत होऊ शकते.