Castor Oil For Constipation And Colon Clean : लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या व्यक्तीपर्यंत अनेकांना बद्धकोष्ठतेची समस्या आहे. बदलेली जीवनशैली, बाहेरचं जास्त खाणं, अनहेल्दी फूड, जागरण,  व्यायामाचा अभाव यामुळे आज अनेकांना ही समस्या सतावतेय. सकाळी उठल्यावर पोट साफ न होणे, शौचाला जोर लावावा (Constipation Home Remedies)लागतोय, शौचाला कडक होत अशा अनेक समस्याने ग्रासलेले असतात. या समस्येकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. कारण त्यातूनच पुढे मुळव्याधीचा त्रास उद्भवतो. (How To Get Rid Of Constipation Immediately) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या समस्येसाठी डॉक्टरांच्या पायऱ्या न चढता तुम्ही घरच्या घरी उपाय करु शकता. आयुर्वेदात यावर रामबाण उपाय सांगण्यात आला आहे. जगप्रसिद्ध योगी सद्गुरु जग्गी यांनी यूट्यूबवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात त्यांनी यावर एक साधा आणि सोपा उपाय सांगितला आहे. (Home Remedies Castor Oil For Constipation And Colon Clean Sadhguru tips for constipation Ayurvedic Remedies)


त्यांनी सांगितलं आहे की, आयुर्वेदात कुठल्याही आजारासाठी पहिले तुमचं पोट साफ केलं जातं. कोलन क्लीनिंग आणि मानसिक आरोग्य यांचा जवळचा संबंध असल्याचंही ते म्हणाले. पोटाशी संबंधित बद्धकोष्ठतेच्या आजारावर त्यांनी एका तेलाचा उपाय सांगितला आहे. 


एरंडेल तेल हे बद्धकोष्ठतवर रामबाण उपाय असून या समस्येपासून तुम्हाला आराम मिळतो. पोटफुगी आणि गॅसच्या समस्येपासूनही तुमची मुक्ती करतो. त्यामुळे सद्गुरु जग्गी यांनी सांगितलं की, शरीर शुद्ध करण्यासाठी एरंडेल तेलाचं जरूर सेवन करा. एरंडेल तेल हे गुदाशय आणि पचनसंस्था स्वच्छ करतो. 


पोट साफ करण्यासाठी असे करा सेवन !


विशेष म्हणजे अमेरिकन शास्त्रज्ञांनीही असा दावा केला आहे की, एरंडेल तेलाचं सेवन केल्यास आतडे स्वच्छ होते आणि शौचास त्रास होत नाही. 



तीन चमचे एरंडेल तेल घ्या आणि ते पाण्यात किंवा दुधात मिसळून सेवन करा. पोट साफ करण्यासाठी या तेलाचं सेवन महिन्यातून एक ते तीन वेळा करणे फायदेशीर ठरेल.