बिछाना ओला करण्याची लहान मुलांची सवय दूर करतील हे ४ घरगुती उपाय!
लहान मुलांची बिछाना ओला करण्याची सवय काही नवीन नाही.
मुंबई : लहान मुलांची बिछाना ओला करण्याची सवय काही नवीन नाही. पण मोठे झाल्यावर त्यांची ही सवय आपोआप दूर होते. पण काही मुले मोठी झाल्यावरही बिछाना ओला करतात. ही सवय पालक व मुलं दोघांनाही त्रासदायक ठरते. मुलांची ही सवय एक समस्या आहे, याची कल्पनाही अनेक पालकांना नसते. अनेकदा चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयीमुळे ही समस्या उद्भवते. पण काही सवयी बदलल्यास ही समस्या दूर होऊ शकते. त्याचबरोबर हे घरगुती उपायही ही समस्या दूर करण्यास मदत करतील...
# रोज रात्री झोपण्यापूर्वी मुलांना ओव्याचे चूर्ण खायला द्या. काही दिवस नियमित हा उपाय केल्याने नक्कीच फायदा होईल.
# मनुके, काळीमिरीसोबत खाल्यानेही फायदा होतो.
# ही समस्या असल्यास रोज रात्री झोपण्यापूर्वी अक्रोड व मनुकांचे सेवन करा.
# जांभळाची बिया सुकवून त्या वाटून घ्या. रोज रात्री झोपण्यापूर्वी काही प्रमाणात हे चूर्ण मुलांना खायला द्या. हा उपायही फायदेशीर ठरेल.
टिप : या घरगुती उपायांचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. तरी देखील तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.