या ५ उपयांनी दूर करा कोपरं, गुडघ्यांचा काळसरपणा!
त्वचेच्या समस्यांवर अनेक घरगुती उपाय आहेत.
मुंबई : त्वचेच्या समस्यांवर अनेक घरगुती उपाय आहेत. अनेकदा कोपरं, घोटे, गुडघे यांची त्वचा काहीशी काळसर असते. मृत त्वचा जमा होऊन या काळसरपणा येतो. ही समस्या दूर करण्यासाठी बाजारात अनेक क्रिम आणि लोशन उपलब्ध आहेत. पण घरच्या घरी अगदी सोप्या उपायांनी गुडघे, कोपरांचा काळेपणा दूर होतो. पहा कोणते आहेत ते उपाय...
काकडी आणि चिंच
एक चमचा काकडीच्या रसात अर्धा चमचा चिंचेचा कोळ घालून गुडघे, कोपरांवर लावा. १५ मिनिटांनी त्वचा स्वच्छ धुवा.
व्हिनेगर आणि दही
दह्यात लॅक्टिक अॅसिड असते. ते ब्लीचसारखे काम करते. एक वाटी दह्यात व्हिनेगर घाला आणि कोपरं, गुडघ्यांवर मसाज करा. १५ मिनिटांनी धुवा. हा उपाय काही दिवसांसाठी नियमित करा.
खोबरेल तेल
रोज रात्री झोपण्यापूर्वी कोपर, गुडघ्यांना खोबरेल तेलाने मसाज करा. खोबरेल तेलात लॉरिक अॅसिड आणि प्रोटीन असते. त्यामुळे कोरड्या त्वचेला तजेला मिळतो.
दूध आणि मध
एक वाटी दूधात मध मिसळा आणि कोपरं, गुडघे, घोट्यांना लावा. १० मिनिटांनंतर थंड पाण्याने धुवा.
लिंबाचा रस
रोज रात्री झोपण्यापूर्वी लिंबाचा रस कोपरं, गुडघ्यांना लावा आणि सकाळी धुवा. काही दिवसातच तुम्हाला फरक दिसेल.