मुंबई : हिवाळ्यात तापमान खालावतं आणि त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण होतो. थंडीच्या दिवसांत आरोग्याकडे खासकरुन त्वचेकडे लक्ष देण्याची फार गरज असते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

थंडीच्या दिवसांत त्वचा कोरडी पडते, ओठ फाटतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला काही घरगुती टिप्स सांगणार आहोत ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमचे ओठ आणि त्वचा चांगली ठेवू शकाल.


थंडीत ओठांची अशी घ्या काळजी...


  • फाटलेल्या ओठांना सॉफ्ट आणि मऊ ठेवण्यासाठी मध एक चांगला उपाय आहे. फाटलेल्या ओठांवर दररोज २-३ वेळा मध लावावे. थोडसं मध रात्री झोपण्यापूर्वी लावावं. 


  • दिवसातून २-३ वेळा ओठांवर ऑलिव्ह ऑइल किंवा खोबरेल तेल लावल्यास फुटलेल्या ओठांना काहीसा आराम मिळतो.


  • १ चमचा दूध आणि १ चमचा मध एकत्रित करुन हे मिश्रण फ्रिजमध्ये ठेवा. त्यानंतर थंड झाल्यास हे मिश्रण ओठांवर हलक्या हाताने लावा.


  • ओठ फाटल्यानंतर ओठांवरील निघालेली त्वचा काढू नका. असे केल्यास ओठ आणखीन फाटण्याची शक्यता असते तसेच दुखापतही होऊ शकते.


  • ओठांना लीप लोशन किंवा लीप बाम लावून घराबाहेब पडावे.


  • थंडीत अतिशय थंड पाण्याने आंघोळ केल्यामुळे त्वचा जास्त ड्राय पडू शकते.


  • अनेकांच्या शरीराला क्रीम लावल्याने रिअॅक्शनही येऊ शकते. त्यामुळे अशा क्रीम लावण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.